मुंबईकरांसाठी खतरनाक पर्याय...! सुटकेस घ्या आणि १९ किमी फिरा, ऑफिसला ये-जा करण्यासाठी कॉम्पॅक्ट बाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 20:34 IST2025-01-24T20:34:21+5:302025-01-24T20:34:39+5:30
एका सुटकेसच्या आकाराची ही स्कूटर आहे. कंपनीने २०२३ मध्येच या स्कूटरबाबत माहिती दिली होती.

मुंबईकरांसाठी खतरनाक पर्याय...! सुटकेस घ्या आणि १९ किमी फिरा, ऑफिसला ये-जा करण्यासाठी कॉम्पॅक्ट बाईक
ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये होंडाने पहिली ईलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. यामुळे चेतक, ओलापासून टीव्हीएससारख्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. अशातच होंडाने छोट्या छोट्या प्रवासांसाठी एक फोल्डेबल ईलेक्ट्रीक स्कूटरही दाखविली आहे. जी पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी स्टेशन ते ऑफिस, ऑफिस ते स्टेशन सारख्या ठिकाणी सहज वापरता येऊ शकणार आहे.
एका सुटकेसच्या आकाराची ही स्कूटर आहे. कंपनीने २०२३ मध्येच या स्कूटरबाबत माहिती दिली होती. या ऑटो एक्सपोमध्ये ती भारतात दाखविण्यात आली. ही स्कूटर २०२६ मध्ये लाँच केली जाऊ शकते. या स्कूटरचे नाव सध्या Honda Motocompacto असे ठेवण्यात आले आहे.
होंडाची ही स्कूटर केवळ १९ किलोची आहे, व ही स्कूटर सुटकेससारख्या आकारात फोल्ड होते. ही स्कूटर तुम्ही तुमच्या सोईनुसार कुठेही फोल्ड करून घेऊन जाऊ शकता. या स्कूटरची रेंजही 19.31 किमी एवढी आहे. Honda Motocompacto इलेक्ट्रिक स्कूटर एवढी हलकी आहे की तुम्ही ते सहजपणे उचलू शकता आणि वाहून नेऊ शकता.
परमनंट मॅग्नेट डायरेक्ट-ड्राइव्ह मोटर वापरण्यात आली आहे. यात ०.७ kWh बॅटरी पॅक आहे, जो ४९० W पॉवर आणि १६ Nm टॉर्क जनरेट करतो. या स्कूटरमध्ये फ्रंट व्हील ड्राइव्ह मोड आहे. म्हणजेच मोटर पुढच्या चाकाला ताकद देते. या स्कूटरचा टॉप स्पीड 24.14 किमी प्रति तास आहे. ही स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता भासणार नाही.