लाँच झाली होंडा सिटीची हॅचबॅक कार; पहा पहिल्यांदा कुठे विकली जाणार, किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 09:34 IST2020-11-26T09:34:00+5:302020-11-26T09:34:46+5:30
Honda City's hatchback: भारतात Honda City ची हॅचबॅक कार केव्हा लाँच होईल याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. कारचा लूक चांगला बनविण्यात आला आहे.

लाँच झाली होंडा सिटीची हॅचबॅक कार; पहा पहिल्यांदा कुठे विकली जाणार, किंमत
होंडा सिटीची ही भारतीय बाजारावर अधिराज्य गाजविणारी ताकदवान सेदान कार आहे. जर सारे काही नीट राहिले तर या कारची हॅचबॅक कारही भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने सध्ये थायलंडमध्ये होंडा सिटी हॅचबॅक कार लाँच केली आहे. यामुळे सर्वात आधी थायलंड आणि इंडोनेशियामध्ये हॅचबॅक कारची विक्री सुरु होणार आहे.
भारतात Honda City ची हॅचबॅक कार केव्हा लाँच होईल याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. कारचा लूक चांगला बनविण्यात आला आहे. ही कार सेदानच्याच प्लॅटफॉर्मवर आधारलेली आहे. सिटी हॅचबॅकचे बॉडी पॅनेल्सही सेदानचेच घेण्यात आले आहेत.
कारमध्ये स्पोर्टी लूकसाठी ब्लॅक आऊट ग्रील आणि डार्क क्रोम फिनिश देण्यात आले आहे. याशिवाय कारमध्ये 16 इंचाचे अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. कारच्या इंटेरिअरमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. ते सिटी सेदान सारखेच आहेत. कंपनीने थायलंडमध्ये या कारचे तीन व्हेरिअंट लाँच केले आहेत. यामध्ये S+, SV आणि RS असे व्हेरिअंट आहेत.
याकारमध्ये 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 122 एचपीची ताकद प्रदान करते. या इंजिनासोबत सीव्हीटी गिअरब़ॉक्स देण्यात आला आहे. सिटी हॅचबॅकमध्ये जादातर फिचर्स हे होंडा सेदानचेच आहेत.
थायलंडमध्ये ही कार 14.59 लाख रुपये (भारतीय) ते 18.25 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एस प्लस व्हेरिअंटची किंमत 14.59 लाख रुपये आहे. तर एसव्ही व्हेरिअंटची किंमत 16.44 लाख रुपये आहे. तर आरएस व्हेरिअंटची किंमत 18.25 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार भारतीय बाजारात कधी उतरविली जाते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण या श्रेणीमध्ये भारतीय बाजारात एकही हॅचबॅक कार नाहीय.