शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Honda CB750 Hornet: एकच नंबर! ६ गिअरबॉक्सवाली स्पोर्ट्स बाइक आली, किंमत अन् फिचर्स जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 17:22 IST

Honda CB750 Hornet Price: Honda ने शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट फिचर्ससह आपली स्पोर्टिंग बाइक CB750 Hornet लाँच केली आहे. होंडाच्या नव्या बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊयात.

दुचाकी उत्पादक Honda गेल्या अनेक महिन्यांपासून टीझर जारी करत होती आणि अखेर कंपनीने आपली नवीन Honda CB750 Hornet बाईक लॉन्च केली आहे. महत्त्वाच्या फिचर्सबाबत बोलायचं झालं तर, Honda बाइकमध्ये कंपनीने 755 cc पॅरलल-ट्विन इंजिन दिलं आहे जे 9,500 rpm वर 92hp आणि 7000rpm वर 74.4Nm टॉर्क जनरेट करते. या Honda बाईकमध्ये कंपनीला चार रायडर मोडसह व्हील कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, ऑप्शनल बाय-डायरेक्शनल क्लिकशिफ्टर आणि इंजिन ब्रेक कंट्रोल यासारखे फीचर्स मिळतील. या बाईकच्या फीचर्स आणि किंमतीची सविस्तर माहिती घेऊयात.

इंजिन आणि गिअरबॉक्स755cc पॅरलल-ट्विन इंजिनद्वारे ही बाईक 270-डिग्री फायरिंग ऑर्डरचा वापर करून V-ट्विन इंजिनचा आवाज निर्माण करते. या बाईकमधील इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे जे स्लिप/असिस्ट क्लचसह येतं आणि तुमची इच्छा असल्यास तुम्ही ते ऑप्शनल बायडायरेक्शन क्विकशिफ्टरसोबतही जोडू शकता.

इंधन क्षमता आणि फिचर्सया बाइकची १५.३ लीटर इंधन क्षमता आहे. तर एकूण वजन १९० किलो इतकं आहे. बाइकमध्ये कंपनीनं ५ इंचाचा फूल कलर टीएफटी डिस्प्ले दिला गेला आहे. सोबतच स्पोर्टिंग बाइकमध्ये चार पावर मोड्स देखील देण्यात आले आहेत. पहिला स्पोर्ट्स, दुसरा स्टँडर्ड, तिसरा रेन आणि चौथा यूजर जो पूर्णपणे कस्टमाइज थिमवर आहे. Honda ने आपल्या CB750 Hornet मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ सपोर्ट आणि Honda स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सारखे फीचर्स दिले आहेत.

Honda CB750 Hornet Price  आणि रंगयुरोपियन मार्केटमध्ये या बाईकची किंमत 6,999 युरो (जवळपास 6.50 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. ग्लेअर व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक, गोल्डफिंच यलो आणि इरिडियम ग्रे मेटॅलिक अशा चार वेगवेगळ्या रंगांमध्ये ही बाईक ग्राहकांसाठी आणण्यात आली आहे.

जागतिक बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर लवकरच ही बाईक भारतीय बाजारपेठेतही दाखल होऊ शकते आणि जागतिक किंमत पाहता, होंडाची ही बाईक भारतीय बाजारपेठेत 7 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या दरम्यान लॉन्च केली जाऊ शकते. हा फक्त एक अंदाज व्यक्त आहे आणि भारतीय बाजारात बाइक लॉन्च झाल्यावरच अधिकृत किंमत उघड होईल.

टॅग्स :HondaहोंडाAutomobile Industryवाहन उद्योग