शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

Honda CB350 RS भारतात लाँच; पाहा किती आहे किंमत, काय आहेत फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 14:26 IST

Honda CB350 RS : 350CC इजिन क्षमतेच्या सेगमेंटमध्ये ही बाईक Royal Enfield ला देणार टक्कर

ठळक मुद्दे350CC इजिन क्षमतेच्या सेगमेंटमध्ये ही बाईक Royal Enfield ला देणार टक्कर यापूर्वी कपनीनं लाँच केली होती CB350 बी बाईक

Honda CB350 RS Launched: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियानं भारतात आपली सीबी रेंजचं नवं मॉडेल लाँच केलं आहे. कंपनीनं आपली नवी बाईक CB350 RS लाँच केली. या बाईकची किंमत तब्बल १.९६ लाख (एक्स शोरूम) इतकी आहे. या बाईकचं बेस व्हेरिअंट यापेक्षा १० हजार रूपयांनी स्वस्त आहे. होंडा CB350 RS ही बाईक रेड मेटलिक आणि पर्ल स्पोर्ट्स या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. CB350 RS यामधील आरएसचा अर्थ हा रोड सेलिंग असा आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासातही बाईक चालवणाऱ्याला आणि त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्यालाही आराम मिळेल अशी ही बाईक तयार करण्यात आल्याचा दावा कंपनीनं केला आहे. CB350 RS मध्ये इंजिन आणि त्याचे अन्य पार्ट्स CB350 प्रमाणेच आहेत. CB350 RS मध्ये 348 सीसीचं इंजिन, सिंगल सिलिंडर एअर कुल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 20.8 हॉर्स पॉवर आणि 30Nm चा टॉर्क जनरेट करतो. यामध्ये 5 स्पीड ट्रान्समिशन गियरबॉक्स देण्यात आला आहे. काय आहे विषेश?CB350 RS मध्ये होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल देण्यात आला आहे. ही कंपनीची एक कंट्रोल सिस्टम आहे आणि ते सुरू किंवा बंदही केलं जाऊ शकतं. CB350 RS मध्ये शेप्ड एलईडी टर्न इंडिकेटर्ससोबतच Front Fork Gaiters देण्यात आले आहे. यामध्ये स्किड प्लेट आणि आणि 150/170 सेक्शन रिअर टार्सही आहेत. या बाईकच्या रिअर एन्डमध्ये काही बदल करण्यात आला आहे आणि तो CB350 पेक्षा वेगळा दिसतो. याव्यतिरिक्त  CB350 RS मध्ये सीटिंग अधिक चांगलं करण्यात आलं आहे आणि त्यात टक अँड रोल डिझाईनही देण्यात आलंय.

Royal Enfiled ला टक्करCB350 च्या आतापर्यंत १० हजारांपेक्षा अधिक बाईक्सची विक्री झाली आहे. 350 CC इंजिन क्षमता असलेल्या सेगमेंटमध्ये Royal Enfield Meteor 350 ला Honda H’ness CB350 नं मोठी टक्कर दिली आहे. ज्या प्रकारे Honda H’ness CB350 नं उत्तम कामगिरी केली आहे त्याप्रमाणे CB350 RS चीही उत्तम विक्री होईल अशी अपेक्षा कंपनीनं व्यक्त केली आहे. 

टॅग्स :HondaहोंडाbikeबाईकIndiaभारतRoyal Enfieldरॉयल एनफिल्ड