शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
3
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
4
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
5
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
6
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
7
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
8
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
9
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
10
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
11
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
12
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
13
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
14
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
15
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
16
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
17
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
18
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
20
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ

Honda Amaze: अमेझिंग! CNG कारच्या स्पर्धेत आणखी एक बडी कंपनी उतरणार; मारुतीच्या डिझायरला टक्कर देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 14:42 IST

Honda Amaze CNG launch soon:  गेल्या काही महिन्यांपासून सीएनजी कारची मागणी वाढली आहे. मारुतीकडे 6 सीएनजी कार (Maruti CNG Car) आहेत, तर आणखी दोन लवकरच येणार आहेत.

महागड्या पेट्रोल डिझेलमुळे ग्राहक CNG कारकडे वळू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सीएनजी कारची मागणी वाढली आहे. मारुतीकडे 6 सीएनजी कार (Maruti CNG Car) आहेत, तर आणखी दोन लवकरच येणार आहेत. अशावेळी सीएनजी ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी टाटा, फोर्डबरोबर होंडादेखील आपली सीएनजी कार लवकरच बाजारात आणणार आहे. ( Honda Amaze will receive a mid-life facelift in August 2021.  Honda Amaze CNG variant has been spotted testing.) 

Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज

भारतीय बाजारात सेदान सेगमेंटमध्ये सध्या ह्युंदाई ऑरा ही एकच कार सीएनजीमध्ये आहे. तर मारुतीची डिझायर, फोर्डची अस्पायर आणि टाटाची टिगॉर येण्याची शक्यता आहे. यामुळे होंडाच्या नव्या सीएनजी अमेझ कारला ह्युंदाई आणि मारुतीच्या कारसोबत टक्कर द्यावी लागणार आहे. Honda Amaze CNG व्हेरिअंट टेस्टिंग करताना दिसले आहे. 

Maruti CNG Car: मारुतीच्या दोन सीएनजी कार लवकरच लाँच होणार; शानदार मायलेज अन् पैशांची बचत

कदाचित मारुती डिझायर आणि होंडा अमेझ एकाच महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. होंडाने जर अमेझ सीएनजीमध्ये लाँच केली तर ती कंपनीची पहिली सीएनजी कार असेल. कंपनीने अद्याप यावर काही माहिती दिलेली नाही. 17 ऑगस्टला होंडा आपली अमेझची फेसलिफ्ट लाँच करणार आहे. सध्याच्या अमेझमध्ये बाहेरून आणि आतून अनेक बदल अपेक्षित आहेत. चांगले फिचर मिळण्याची शक्यता आहे. इंजिन सेटअप बदलण्याची शक्यता कमी आहे. 

TATA Nexon सीएनजीमध्येही येण्याची शक्यता; पुण्यात टेस्टिंगवेळी झाली स्पॉट

होंडाने अमेझचे पहिले फेसलिफ्ट 2018 मध्ये लाँच झाले होते. पहिल्या अमेझचा चेहरामोहराच कंपनीने बदलला होता. नव्या थिमवर दुसरी अमेझ लाँच झाली होती. आता कंपनी यामध्ये नवीन रंग देऊ शकते. सध्याच्या अमेझची किंमत दिल्लीत 6.22 ते 9.99 लाखांच्या आसपास आहे. 

एप्रिल महिन्यात टाटा मोटर्सने (Tata Motors) त्यांच्या ताफ्यातील काही कार सीएनजी (CNG) पर्यायातही उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. यानंतर टियागो (Tiago CNG) ही हॅचबॅक कार सीएनजी टेस्टिंग करताना दिसली होती. आता सर्वाधिक खपाची बनलेली आणि पेट्रोल, डिझेलसह इलेक्ट्रीक अवतारात असलेली फाईव्ह स्टार रेटिंगवाली कॉम्पॅक्ट एसयुव्ही नेक्सॉन (Tata Nexon) देखील सीएनजीमध्ये येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Honda Amazeहोंडा अमेझHondaहोंडा