शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Hero Splendor + XTEC Launch : नव्या लूकमध्ये 'जनता की मोटरसायकल' लॉन्च, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 21:57 IST

Hero Splendor + XTEC Launch : Hero Splendor लोकांमध्ये 'जनता की मोटरसायकल' या नावाने लोकप्रिय आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल Hero Splendor+ कंपनीने पूर्णपणे नवीन रूपात लॉन्च केली आहे. यात 4 नवीन रंग आणि अनेक उत्तम फीचर्स मिळणार आहेत. याशिवाय, मोटरसायकलची किंमतही किफायतशीर ठेवण्यात आली आहे.

Hero Splendor लोकांमध्ये 'जनता की मोटरसायकल' या नावाने लोकप्रिय आहे. या मोटरसायकलची निर्माता कंपनी Hero MotoCorp ने त्याची नवीन आवृत्ती Hero Splendor + XTEC लाँच केली आहे.

i3S पेटंट टेक्नॉलॉजीनवीन Hero Splendor+ XTEC मध्ये 97.2cc चे BS-6 इंजिन असणार आहे. ते 7.9 bhp ची मॅकस पॉवर आणि 8.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. कंपनीने यामध्ये आपली i3S पेटंट टेक्नॉलॉजी दिली आहे, ज्यामुळे ही मोटरसायकल उत्तम मायलेज देते.

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मायलेज इंडिकेटरसह अनेक फीचर्सनवीन Hero Splendor+ XTEC मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीटर, रिअल टाईम मायलेज इंडिकेटर, कॉल आणि एसएमएस अलर्ट, फ्युएल इंडिकेटर, एलईडी हेडलॅम्प, यूएसबी चार्जर, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ आणि स्टॉप-स्टार्ट सिस्टम यांसारखी नवीन फीचर्स मिळतील. दुसरीकडे, तोल गेल्याने तुमची मोटारसायकल घसरली तरी इंजिन आपोआप बंद होईल.

चार नवीन रंगात उपलब्धनवीन Hero Splendor + XTEC चार नवीन रंगामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. Sparkling Beta Blue, Canvas Black, Tornado Grey आणि Pearl White या रंगात आहे.  XTEC रेंजमध्ये Hero Glamour 125, Pleasure+ 110 आणि Destini 125 च्या यशानंतर कंपनीने ही सर्वात लोकप्रिय मोटारसायकल Hero Splendor+ सोबत लॉन्च केली आहे.

इतकी आहे Hero Splendor+ XTEC ची किंमतHero Splendor+ XTEC ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 72,900 रुपये आहे. यासोबत कंपनी 5 वर्षांची वॉरंटी देत ​​आहे.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पmotercycleमोटारसायकलbikeबाईकAutomobileवाहन