शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

Splendor चा इलेक्ट्रिक अवतार पाहून तुम्हीही म्हणाल ‘Wow’, सिंगल चार्जमध्ये 180 KM पर्यंत रेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:38 IST

Hero Splendor Electric : विनय राज सेमशेखर यांनी अलीकडेच हिरो स्प्लेंडरचा (Hero Splendor) इलेक्ट्रिक अवतार ऑनलाइन दाखवला आहे.

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicles) ट्रेंड सुरू झाला असून ग्राहक त्याकडे वळू लागले आहेत. खरेदीचा वेग मंदावला असेल पण तरीही त्यांचा अवलंब केला जात आहे, विशेषत: दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांना कारच्या तुलनेत अधिक वेगाने पसंती दिली जात आहे.

विनय राज सेमशेखर यांनी अलीकडेच हिरो स्प्लेंडरचा (Hero Splendor) इलेक्ट्रिक अवतार ऑनलाइन दाखवला आहे. फोटोमध्ये दिसणारी बाईक हीरो मोटोकॉर्पनेच डिझाईन केली आहे असे दिसते. अशा परिस्थितीत हिरोने येत्या काळात खरोखरच स्प्लेंडरला इलेक्ट्रिक बनवले तर वातावरण बदलेल.

लिंक्डइनवर इलेक्ट्रिक हिरो स्प्लेंडरचा फोटो शेअर करताना विनय राज सेमशेखर यांनी म्हटले की, “हीरो स्प्लेंडर ही भारतीय ग्राहकांसाठीही गरज बनली आहे. त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे आणि ती कधीही वृद्ध होत नाही. आपण त्याच्या डिझाइनमध्ये देखील कोणतीही त्रुटी शोधू शकत नाही. त्याचा प्रत्येक भाग आवश्यक आणि कार्यक्षम आहे आणि तुम्हाला या बाईकमध्ये पुरेशी जागा मिळते.”

जुन्या बाईकमधून घेतलेले बहुतेक भागदरम्यान, हे एक डिजिटल रेंडर आहे, ज्यामध्ये जुन्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्प्लेंडरमधून घेतलेले बहुतेक भाग आहेत आणि इलेक्ट्रिक अवतारसाठी फक्त काही बदल केले आहेत. बाईकच्या इंजिनला काळ्या रंगाच्या बॅटरी पॅकने बदलले आहे आणि त्याच्या इंजिनशिवाय गिअरबॉक्स काढून टाकण्यात आला आहे. ती इलेक्ट्रिक दिसण्यासाठी बाईकच्या सर्व ठिकाणी निळ्या रंगाची पट्टी देण्यात आली आहे ज्यामुळे ती दिसायला खूपच आकर्षक आहे.

इलेक्ट्रिक स्प्लेंडर किती दमदार आहे?हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या रेंडरमध्ये बाईकसोबत 9kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जे बाईकच्या मागील चाकाला पॉवर देते. तसेच या बाईकसोबत वेगळी 2 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी लहान आकाराची असेल असे गृहीत धरले जाऊ शकते. स्प्लेंडरमध्ये पेट्रोल जिथून भरते, ते चार्जिंग पोर्ट या बाइकमध्ये देण्यात आले आहे. 6 kWh बॅटरीसह, बाईक 180 किमीची रेंज देते जी 4 kWh बॅटरीसह 120 किमीपर्यंत कमी होते.

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरhero moto corporationहिरो मोटो कॉर्प