शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 6,000 रुपयांनी महागली, जाणून घ्या नवीन किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 18:51 IST

हिरो मोटोकॉर्पच्या Vida V1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आता मुंबईत 1 लाख 45 हजार 900 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

इलेक्ट्रिक वाहनांवर मिळणाऱ्या सबसिडीत कपात करण्यात आल्यामुळे हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 Pro च्या किमतीत 6,000 रुपयांनी वाढ केली आहे. जर तुम्हीही हीरो ब्रँडची ही लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर याच्या किंमतीबद्दल माहिती जाणून घ्या...

हिरो मोटोकॉर्पच्या Vida V1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आता मुंबईत 1 लाख 45 हजार 900 रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसेच, अहमदाबाद, नवी दिल्ली, वडोदरा आणि सुरत सारख्या शहरांमध्ये ही स्कूटर आता 1 लाख 25 हजार 900 रुपयांना (एक्स-शोरूम) खरेदी केली जाऊ शकते. या किमतीमध्ये पोर्टेबल चार्जर आणि FAME II सबसिडी समाविष्ट आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.94kWh बॅटरी आहे, जी 5 तास 55 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होते. या स्कूटरबद्दल असा दावा करण्यात आला आहे की, एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 165 किलोमीटरपर्यंत धावू शकते. दरम्यान, ही स्कूटर 3.2 सेकंदात 40 चा स्पीड पकडते आणि या स्कूटरचा टॉप स्पीड 80kmph आहे.

TVS iQube 22 हजार रुपयांपर्यंत महागअलीकडेच TVS मोटरने या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 17 हजार रुपयांवरून 22 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. तसेच, ओला इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरच्या किंमतीत 15,000 रुपयांची वाढ केली आहे. किंमतवाढीनंतर, Ola S1 Pro ची किंमत आता 1,39,999  रुपये आणि Ola S1 ची किंमत 1,29,999 रुपये आहे, या दोन्हीच्या एक्स-शोरूम किमती आहेत.

टॅग्स :Automobileवाहन