खूशखबर! Tata Motors नेक्सॉनसह चार CNG कार आणणार; पैसे वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:36 PM2021-09-21T13:36:51+5:302021-09-21T13:40:36+5:30

Tata Nexon CNG Altroz Tiago Tigor CNG Launch: टाटा मोटर्स अपकमिंग सीएनजी कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल मोटर देण्याची शक्यता आहे. सर्व कारमध्ये हेच इंजिन असेल. याची रेंजही चांगली असण्याची अपेक्षा आहे.

Good news! Tata Motors to launch four CNG cars with Nexon; Will save money | खूशखबर! Tata Motors नेक्सॉनसह चार CNG कार आणणार; पैसे वाचणार

खूशखबर! Tata Motors नेक्सॉनसह चार CNG कार आणणार; पैसे वाचणार

Next

भारतात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्याने लोकांचा ओढा सीएनजी आणि इलेक्ट्रीक कारकडे वळू लागला आहे. इलेक्ट्रीक कारचे जास्त पर्याय लोकांसमोर नाहीत, तसेच महागडेही आहेत. यामुळे लोक सीएनजी कारचा ताफा असलेल्या मारुतीकडे वळत आहेत. ह्युंदाईकडे दोन पर्याय आहेत. परंतू, या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी Tata Motors ने कंबर कसली आहे. (Tata Nexon CNG Altroz Tiago Tigor CNG varient will Launch soon.)

टाटा मोटर्स आपल्या दणकट नेक्सॉनसह (Tata Nexon), Tata Altroz, Tata Tiago आणि Tata Tigor चे सीएनजी व्हेरिअंट लाँच करणार आहे. यामुळे काही महिन्यांत लोकांसमोर पैसे वाचविण्यासाठी चांगले पर्याय उपलब्ध होणार आहेत. 

या वर्षाच्या अखेरपर्यंत Tata Nexon CNG, Tata Altroz CNG, Tata Tiago CNG आणि Tata Tigor CNG मॉडेल लाँच होतील. कंपनीने या बाबत काही ठोस सांगितलेले नसले तरी देखील टाटाच्या या कारना सीएनजी टेस्टिंग किटसह पाहिले गेले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नेक्सॉन, अल्ट्रूझ सीएनजी दिसली होती. याचबरोबर टाटा मोटर्स पुढील महिन्यात टाटा पंच (Tata Punch) मायक्रो एसयुव्ही लाँच करणार आहे.

टाटा मोटर्स अपकमिंग सीएनजी कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल मोटर देण्याची शक्यता आहे. सर्व कारमध्ये हेच इंजिन असेल. याची रेंजही चांगली असण्याची अपेक्षा आहे. Tata Motors या कारच्या किंमती सध्याच्या मॉडेलपेक्षा 40 ते 50 हजार रुपयांनी जास्त ठेवण्याची शक्यता आहे.

Web Title: Good news! Tata Motors to launch four CNG cars with Nexon; Will save money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा