शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

Fortuner च्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; कंपनीने लॉन्च केले नवीन एडिशन, जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 6:06 PM

Toyota Fortuner Leader Edition Launch in India: भारतात टोयोटा कंपनीच्या Toyota Fortuner गाडीची खुप क्रेझ पाहायला मिळते.

Toyota Fortuner Leader Edition Launch in India : भारतात टोयोटा कंपनीच्या फॉर्च्युनर( Toyota Fortuner) गाडीची खुप क्रेझ पाहायला मिळते. विविध पक्षातील नेते आणि सेलिब्रिटी या गाडीचा वापर करतात. भारतातील महागड्या गाड्यांपैकी ही गाडी आहे. आता टोयोटा-किर्लोस्करने फॉर्च्युनरच्या चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने फॉर्च्युनरचे नवीन एडिशन लॉन्च केले आहे. 

कंपनीने भारतात पहिल्यांदा 2009 मध्ये फॉर्च्युनर लॉन्च केली होती. तेव्हापासून या कारच्या 2.5 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. कारच्या या यशस्वी विक्रीनंतर कंपनीने या कारचे नवीन एडिशन लॉन्च केले आहे. कंपनीने आपल्या नवीन Fortuner LEADER EDITION मध्ये काही नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जोडले आहेत. यासोबतच कारच्या बाहेरील भागाला ड्युअल टोन कलर देण्यात आला आहे. 

मिड एसयूव्ही फॉर्च्युनरचे नवीन एडिशनकंपनीने मध्यम साईज एसयूव्ही फॉर्च्युनरचे नवीन एडिशन लॉन्च केले आहे. आता तुम्हाला तुमची आवडती फॉर्च्युनर नवीन लीडर एडिशनमध्ये मिळाले. कंपनीने फॉर्च्युनरच्या नवीन एडिशनच्या डिझाईनमध्ये बदल केले असून, काही नवीन फीचर्सही जोडले आहेत.

फॉर्च्युनर लीडर एडिशनमध्ये काय बदललेकंपनीने कारच्या बाहेरील भागात काही बदल केले आहेत. कारच्या पुढील आणि मागील बाजूस बंपर स्पॉयलर देण्यात आले आहेत. याशिवाय सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ड्युअल टोन एक्सटीरियर. आता फॉर्च्युनर लीडर एडिशन ड्युअल टोन रंगासह उपलब्ध असेल. या नवीन एडिशनची किंमत 36-40 लाख रुपयांदरम्यान असू शकते.

याशिवाय कंपनीने इंटेरिअरमध्येही बरेच बदल केले आहेत. आतील भागात ड्युअल टोन सीट्सचा पर्याय उपलब्ध आहे. ड्रायव्हरच्या सीटला जास्त उंची देण्यात आली आहे. याशिवाय नवीन एडिशनमध्ये वायरलेस चार्जर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. याशिवाय फॉर्च्युनरच्या नवीन एडिशनमध्ये ब्लॅक अलॉय व्हील्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे कारचा लूक अधिक बोल्ड झाला आहे.

पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल नाहीया कारमध्ये 2.8 लीटर डिझेल इंजिन आहे, जे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले, तर ही कार जास्तीत जास्त 500 Nm टॉर्क आणि 204 PS ची कमाल पॉवर जनरेट करते. पण मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ही कार जास्तीत जास्त 420 Nm टॉर्क आणि 204 PS पॉवर जनरेट करते. हे नवीन एडिशन 4*2 प्रकारासह येते.

टॅग्स :ToyotaटोयोटाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगauto expoऑटो एक्स्पो 2023carकार