पैसा वसूल ऑफर्स,  Nissan Magnite वर होईल 55,000 रुपयांपर्यंतची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 12:47 PM2023-09-23T12:47:32+5:302023-09-23T12:48:12+5:30

ग्लोबल NCAP ने क्रॅश चाचणीनंतर Nissan Magnite कारला अडल्ट सेफ्टी रेटिंगमध्ये 4 स्टार दिले आहेत.

ganesh chaturthi offers save upto rs 55000 on nissan magnite  | पैसा वसूल ऑफर्स,  Nissan Magnite वर होईल 55,000 रुपयांपर्यंतची बचत

पैसा वसूल ऑफर्स,  Nissan Magnite वर होईल 55,000 रुपयांपर्यंतची बचत

googlenewsNext

गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) निमित्ताने निसान कंपनीने ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. कंपनी निसान मॅग्नाइटवर (Nissan Magnite) ऑफरचा वर्षाव करत आहे. या ऑफरचा फायदा फक्त दोन राज्यांमध्ये मिळत आहे, तो म्हणजे तुम्ही या राज्यांमध्ये राहत असाल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. ग्लोबल NCAP ने क्रॅश चाचणीनंतर Nissan Magnite कारला अडल्ट सेफ्टी रेटिंगमध्ये 4 स्टार दिले आहेत.

दरम्यान, Nissan Magnite वरील ऑफरचा लाभ फक्त या कारच्या निवडक व्हेरिएंटवरच उपलब्ध आहे. या कारचा कंफर्ट आणि स्टाईल वाढवण्यासाठी 11 हजार रुपयांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंतच्या अॅक्सेसरीज ऑफर केल्या जात आहेत. याशिवाय तुम्ही तुमची जुनी कार एक्सचेंज केल्यास 20,000 ते 30,000 रुपयांची बचत होऊ शकते. पात्र ग्राहकांना 5,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट बेनिफिट आणि तीन वर्षांचा प्रीपेड देखभाल योजना ऑफर केली जात आहे.

कंपनीकडून Nissan Magnite वर उपलब्ध असलेल्या ऑफरचे फायदे फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये दिले जात आहेत. तसेच, Nissan Magnite वर उपलब्ध ऑफरचा लाभ फक्त सप्टेंबरपर्यंत वैध आहे. याशिवाय, निसान रेनॉल्ट फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडियाच्या माध्यमातून कर्ज घेतल्यावर सर्वात कमी व्याजदराने फक्त 6.99 टक्के कर्ज दिले जात आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याचा फायदा फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये राहणाऱ्या ग्राहकांनाच मिळणार आहे.

Nissan Magnite च्या या स्पेशल एडिशनची सुरुवातीची किंमत 7 लाख 39 हजार रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. तसेच, या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर वायरलेस कनेक्टिव्हिटी, प्रीमियम स्पीकर, अॅम्बियंट लाइटिंग यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, सुरक्षेबाबत बोलायचे झाले तर या कारमध्ये ESP, हिल स्टार्ट असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम देखील देण्यात आली आहे.

Web Title: ganesh chaturthi offers save upto rs 55000 on nissan magnite 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.