शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विसरून जाल Tata Nexon! Maruti आणतेय 10 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीची जबरदस्त SUV

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 19:06 IST

नवी मारुती वायटीबी एसयूव्हीच्या आधिकारिक लॉन्चिंग डेटसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, कारचे प्रोडक्शन व्हर्जन एप्रिल 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते.

मारुती सुझुकी 2023 ची सुरुवात आपल्या पोर्टफोलियोमध्ये एक नवे मॉडेल जोडून करण्यासाठी तयार आहे. कार निर्माता कंपनीने पुष्टी केली आहे, की जानेवारी महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये तीन नव्या एसयूव्ही शोकेश करण्यात येणार आहेत. यात नव्या मारुती कूप एसयूव्हीचाही (कोडनेम- YTB) समावेश असेल. मात्र, हिच्या अधिकृत नावासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकराची माहिती समोर आलेली नाही. मात्र, हिला मारुती बलेनो क्रॉस नाव दिले जाऊ शकते, असे काही माध्यमांतील वृत्तांमधून म्हणण्यात येत आहे. 

बूस्टरजेट इंजिन -मारुतीचे बूस्टरजेट टर्बो पेट्रोल इंजिन नवीन मारुती कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये वापरले जाऊ शकते. यापूर्वी, BS6 तयार नसल्याने हे इंजिन बंद करण्यात आले होते. मात्र, ते आता BS6 सह येईल. या इंजिनमध्ये माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञानही दिले जाऊ शकते. यात नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचे ऑप्शनही दिले जाऊ शकते. जे 1.2L डुअलजेट अथवा 1.5L डुअलजेट माइल्ड हायब्रिड टेक युनिट असू शकते. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक, असे दोन्ही गिअरबॉक्स ऑफर केले जातील.

डिझाईन आणि फीचर्स -मारुती बलेनो क्रॉसमध्ये ब्रँडची नवी एसयूव्ही डिझाईन लँग्युएज बघायला मिळू शकते. जी आपण ग्रँड व्हिटारामध्ये पाहिली आहे. यात स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आणि स्लिम एलईडी डीआरएल तसेच बोनटच्या टॉपवर सिग्निचर 'थ्री-ब्लॉक' मॉनीकरसह अधिक अँग्युलर स्टान्स मिळू शकतो. हिचे काही डिझाईन एलिमेंट्स बलेनो हॅचबॅक आणि फ्यूचरो ई-कॉन्सेप्ट सारखेही असू शकतात. मारुती सुझुकीच्या नव्या कूप एसयूव्हीमध्ये वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी असलेले 9-इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम मिळू शकते. यात व्हॉइस कमांड आणि सुझुकी कनेक्ट फीचर्सदेखील असतील. या कारमध्ये डिजिटल कंसोल, ऑटो एसी यूनिट, रिअर एसी व्हेंट आणि अधिक एअरबॅगदेखील दिल्या जातील.

लॉन्चिंग आणि किंमत -नवी मारुती वायटीबी एसयूव्हीच्या आधिकारिक लॉन्चिंग डेटसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, कारचे प्रोडक्शन व्हर्जन एप्रिल 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. हिच्या बेस मॉडलची किंमत 8 लाख रुपये, तर टॉप-एंड ट्रिमची किंमत 13 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. किंमतीची हीच रेंज असल्यास ही टाटा नेक्सन, निसान मॅग्नाइट, ह्युंदाई वेन्यू सारख्या एसयूव्हींना टक्कर देईल. याशिवाय ही क्रेटाच्याही काही सुरुवातीच्या व्हेरिअंट्सना टक्कर देऊ शकते. 

टॅग्स :MarutiमारुतीTataटाटाAutomobileवाहनauto expoऑटो एक्स्पो 2020