शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Flex Fuel Car: Petrol-CNG विसरुन जा...मारुतीने आणली Flex-Fuel वर चालणारी WagonR; पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 15:27 IST

Flex Fuel Car: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वॅगनआरचे अनावरण करण्यात आले.

Flex Fuel WagonR in India: देशातील सर्वात मोठी कार मेकर कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने 'फ्लेक्स फ्यूलवर' चालणारी WagonR आणली आहे. फ्लेक्स फ्यूलचा अर्थ पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणावर काम करणारे इंधन. कंपनीने आपल्या WagonR चे प्रोटोटाइप मॉडेल दिल्ली येथे आयोजित SIAM (Society of Indian Automobile Manufacturers) च्या कार्यक्रमात सादर केले आहे. कारला E20 (20% इथेनॉल असलेले पेट्रोल) आणि E85 (85% इथेनॉल असलेले पेट्रोल) मधील इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालण्यासाठी डिझाइन केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वॅगनआरचे अनावरण करण्यात आले.

काय आहे Flex Fuel?पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स-इंधनाकडे पाहिले जात आहे. याला पर्यायी इंधन असेही म्हणतात. हे पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणापासून तयार केले जाते. फ्लेक्स इंधन इंजिन पूर्णपणे पेट्रोल किंवा इथेनॉलवर देखील चालू शकतात. फ्लेक्स (Flex) हा इंग्रजी शब्द flexible पासून बनला आहे.

विविध तंत्रज्ञानांवर काम सुरूया तंत्रज्ञानावर काम करत मारुतीने ही वॅगनआर सादर केली आहे. येत्या काही वर्षांत ही सर्वसामान्यांसाठी लाँच केली जाईल. मारुती सुझुकी सध्या इलेक्ट्रिक, हायब्रिड इलेक्ट्रिक, सीएनजी, बायो-गॅस, इथेनॉल, फ्लेक्स-इंधन यासह विविध तंत्रज्ञानावर काम करत आहेत. कंपनीने मार्च 2023 पर्यंत सर्व मॉडेल्स E20 इंधन अनुरूप बनवण्याची घोषणा केली आहे.

गडकरी यांनी Flex Fuelचे फायदे सांगितले

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेचा सामना करण्यासाठी देशाने फ्लेक्स इंधन आणि ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. देशातील 40 टक्के प्रदूषणाचे कारण पेट्रोल आणि डिझेलसारखे इंधन आहे. त्यामुळे भविष्यात पर्यायी इंधन वापरणे काळाची गरज आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीNitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहन