शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कारचे फेसलिफ्ट ही नवनूतनता नव्हे तर मार्केटिंगची युक्तीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 13:11 IST

कारचे फेसलिफ्ट म्हणजे केवळ एक मार्केटिंगचा प्रकार आहे. मूळ ढाचाला हात न लावता विद्यमान मॉडेलला नवा ताजेपणा आणणारे सौंदर्यात्मक बदल म्हणजेच फेसलिफ्ट, असाच स्पष्ट अर्थ त्यातून दिसतो

ठळक मुद्देफेसलिफ्टमध्ये साधारणपणे कारला कॉस्मेटिकली बदल करून सादर केले जातेहे कशासाठी तर पूर्ण नव्याने आरेखन करण्याची गरज पडत नाहीवरवरचे बदल करून कारला नवा लूक आणणे हा एक भाग असतो

भारतात अनेक कंपन्यांच्या मोटारींच्या मॉडेल्सना मध्येमध्ये काहीसे बदलले जाते. एकादे मॉडेल चांगले चालत असताना त्याचा लूक बदलून पुन्हा लोकांसमोर मांडण्याचा व त्यातील सौंदर्य अधिक खुलवण्याचा प्रयत्न करून ते मॉडेल अधिक लोकप्रिय करण्याचा हा प्रयत्न असतो. कारच्या बाह्य व अंतर्भागामधील काही सौंदर्यात्मक व उपयुक्ततावादी घटक बदलण्याचा वा त्याला एक नवा आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. इंग्रजीमध्ये या प्रकाराला facelift किंवा mid-generational refresh करण्याचा प्रकार म्हणतात.

फेसलिफ्टमध्ये साधारणपणे कारला कॉस्मेटिकली बदल करून सादर केले जाते. हे कशासाठी तर पूर्ण नव्याने आरेखन करण्याची गरज पडत नाही, कारला नवा लूक आणणे हा एक भाग असतो, प्रामुख्याने त्यामध्ये मेकॅनिकल किंवा इंजिनादी महत्त्वाच्या बाबींमध्ये काही बदल केले जात नाहीत. कारच्या बाह्य भागामधील हेडलॅम्प, त्याचा आकार, बंपर,फेंडर, रूफ रेलिंग, कारच्या मागील बंपर, त्याला स्पॉइलर लावणे, टेल लॅम्पची रचना बदलणे, कारला ड्युएल टोन देणे, पत्रा जर बदलायचा असेल वा पातळ करून कॉस्ट कटिंग करायचे असेल तरीही ते बदल करणे असे प्रकार केले जातात. ग्राहकांपुढे हे सारे सादरीकरण केले गेल्याने साहजिकच खरेदीदाराला त्याची भुरळ पडते.

कारची शैली, सौंदर्य यामध्ये बदल करणारे हे फेसलिफ्ट विविध कंपन्यांकडून केले गेले आहे.ते ज्या पद्धतीने केले गेले आहे, ते पाहाता त्यामध्ये मार्केटिंग हाच प्रमुख भाग असल्याचे आढळून येते. कारच्या रचनेमध्ये पूर्णपणे बदल केला जात नाही, कारचे वजन वाढवण्याचा वा अनावश्यक वजन कमी करण्याचाही फार प्रयत्न त्यात होतो असे नाही, काहीवेळा कारच्या मूळ रचनेमध्ये बदल आवश्यक असेल तर तो करण्याचाही प्रयत्न केला जात नाही.कंपनीमध्ये कारचा मूळ ढाचा तयार केला गेला त्याला बॉडी इन व्हाइट (BIW)असे म्हटले जाते, त्यात बदल केला जात नाही. भले त्यात काही आवश्यक संरचनात्मक बदल करायचे झाले तरी ते केले जात नाहीत. अनेकदा त्या कारचे बंपर, त्याची रचना बदलली जाते, मात्र ते ज्या बॉडीवर बसतात त्या बॉडीवर बसवण्याच्या पद्धतीतही फार बदल नसतात.

अंतर्गत रचनेमध्ये सीट कव्हरमधील श्रेणी बदल करणे, डॅशबोर्डचा आकार वा रचना थोडी बदलणे,रंग बदलणे, कारच्या बाहेरचा रंग बदलणे वा त्याला काही ड्युएल टोनसारखे स्वरूप देत रूफ रेलिंग वगैरेसारखी वेगळी सुविधा देणे, जी केल्याने कारच्या बॉडी इन व्हाइटला काही धक्का लावावा लागत नाही, ना इंजिनामध्ये फरक करून जास्त ताकदीचे इंजिन दिले गेले आहे,किंवा आणखी काही वेगळे सस्पेंशनचे रूप बदलले आहे असे काही केले जात नाही. त्यामुळे कारचे सौदर्यात्मक, रंगरंगोटीचे काम करून फेसलिफ्ट करणे. कारला नवा ताजेपणा देण्याचा प्रय्तन बाह्यांगाने करणे यालाच फेसलिफ्ट असे साधारणपणे म्हटले जाते. यामुळेच फेसलिफ्ट कार हे केवळ मार्केटिंगचाच प्रकार आहे, असे म्हणावे लागते.

टॅग्स :carकारAutomobileवाहन