शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस-वे वर अतिवेग, अनियंत्रण, अतिआत्मविश्वास हा जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 22:08 IST

एक्स्प्रेस-वे वर ड्रायव्हिंग करणे म्हणजे रेसिंग नाही. तेथे कायम तीन गोष्टी टाळा त्या म्हणजे वाहनाचा अतिवेग, वाहनावरील अनियंत्रण व चालनावरील अतिआत्मविश्वास.

मुंबई - एक्स्प्रेस वे हा अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मुंबई-पणे एक्स्प्रेस-वे वर रस्त्याची स्थिती फार सुखावह नाही. त्यामुळे मुळात तेथे वाहनचालन करताना अतिशय सावधपणे व अतिवेगाने चालवण्याची गरज नाही. दुभाजक असूनही त्याला धडकून दुसऱ्या बाजूच्या वाहनाला धडक देण्याच्या भीषण अपघातात काही काळापूर्वी एका ज्येष्ठ व गुणी नाट्य कलावंताचा मृत्यू झाला होता. त्याच्याबरोबर एका नव्या कालकारालाही आपले प्राण गमवावे लागले होते. अशा प्रकारचा हा अपघात म्हणजे एकंदरच वाहतूक नियम न पाळण्याचा व बेदरकार वाहनचालनाचा नमुना आहे. आजही हा एक्स्प्रेस-वे म्हणजे विविध प्रकारच्या अपघातांचे नमुनेदार संग्रहालय झाल्यासारखे झाले आहे. रांग तोडून ओव्हरटेक करताना होणारा अपघात, रस्त्याच्या बाजूला बिघडलेल्या वाहनांवर व त्यामागे असलेल्या पप्रवाशांनाही धडक देण्याचा अपघात, मोठ्या वाहनांच्या विविध प्रकारच्या त्रुटींमुळे होणारे अपघात, अतिवेग, वाहनावरील अनियंत्रण आणि फाजील आत्मविश्वास हे या महामार्गावरच्या अपघातांमागचे प्रमुख निष्कर्ष असल्याचे जाणवते.

एक्स्प्रेस वे वर वाहनाचा कमाल वेग ताशी ८० किलोमीटर इतका ठेवण्यात आला आहे. मात्र जवळजवळ ९५ टक्के वाहने येथे त्यापेक्षा जास्त वेगाने जाणारी असतात. घाटामध्ये अमृतांजन पॉइंट हा अपघाताचा उच्चबिंदूच आहे. हळूहळू महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर या प्रकारचे रस्ते बनत आहे. विभाजक नसलेल्या रस्त्यावर, महामार्गावर अपघात जास्त होत असल्याचा सर्वसाधारण वाहनचालकांचा दावा असतो. मात्र एक्स्प्रेस वे सारखे रस्ते देऊन लवकर जाण्याचे व गतीमान वाहतूक करण्याचे उद्दिष्ट जर असले तर मात्र अपघाताचे प्रमाण या एक्सप्रेसवेवर वाढणार आहे. याला जसे रस्त्याच्या बांधणीमध्ये परिपूर्णत्त्व नसल्याचेही कारण असते. तसेच वाहनांच्या चालकांचा अतिआत्मविश्वास व अतिवेग ही दोन कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. या द्रुतगती महामार्गावर वाहने चालवणे अद्यापही परिपक्क्व झालेले दिसत नाही. येथे ड्रायव्हिंग कसे करायचे हे समजून घ्यायला हेव, तरच अपघातांचे प्रमाण खूप कमी होऊ शकेल.

ठळक मुद्दे- अतिवेग टाळा, संतुलीत व वेगमर्यादेनुसार वाहन चालवा- वाहन तुमच्या रांगेत रांगेच्या वेगानुसारच चालवा- उज्व्या बाजूच्या पिहल्या रांगेत वेग कमाल ८० असावा अशी अपेक्षा आहे.-  विनाकारण तुमची रांग ओलांडून दुसर्या लाइनीत जाऊ नका.- रांग वा लाइन बदलताना सिग्नल योग्य त्यावेळी द्या- रात्रीच्यावेळी अप्पर डिप्परचा वापर करीत ओव्हरटेक करा- डाव्या वा उजव्या बाजूने वाहनाला ओव्हरटेक करता येते मात्र सिग्नलींग व सुरक्षितता महत्त्वाची- रस्त्याच्या बाजूला विनाकारण थांबू नका- टोल नाक्यावर घाई करून दुसर्या रांगेत घुसू नका- घाटामध्ये ओव्हरटेक करण्यासाठी उतावळे होऊ नका- घाटामध्ये अवजड वाहनाला उतावळेपणाने ओव्हरटेक करायचा प्रयत्न टाळा- योग्य गीयर व योग्य वेग हे चांगल्या चालनाचे लक्षण आहे, इंधन बचतीचेही साधन आहे- रस्त्याच्या बाजूला वाहन थांबवायची गरज पडली तर पार्किंग लाइट चालू ठेवा. - द्रुतगती मार्गावरील सूचनांचे नीट अवलंबन करा- हा मार्ग म्हणजे रेसिंगसाठी नाही हे लक्षात ठेवा- अतिवेग, अनियंत्रण, अतिआत्मविश्वास या तीन बाबी टाळाच. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा