शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रात्रीसाठी अतिरिक्त लाइट्स ही अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 14:55 IST

कारना वा विविध वाहनांना ऑक्झिलरी वा ऑफ रोड लाइट लावण्याचे प्रमाण सध्या खूप वाढलेले दिसते. मात्र त्याला कारण रस्त्यांची स्थिती, नियमांचे उल्लंघन हेआहे. मात्र त्यामुळे रात्रीच्या प्रवासात या अतिरिक्त लाइट्सचा वापर करणे अपरिहार्य बनले आहे

ठळक मुद्देआरटीओच्या नियमाप्रमाणे प्रखर लाइट्स लावण्यास खरे म्हणजे मनाई आहे,पण कोणीच कोणाला विचारीत नाही, अशी स्थिती आहेयामध्ये देशी व परदेशी अशा विविध गोल,चौकोनी आकाराचे हेडलाइट्स विकत मिळतात. त्यात रिफ्लेक्टर हा महत्त्वाचा घटक असतोपरदेशी कंपनीच्या लाइट्सना मागणी अधिक असली तरी त्यांच्या किंमती जास्त असल्याने सर्वांनाच त्या परवडतात असे नाही

कारच्या साधनसामग्रीच्या बाजारात व विशेष करून भारतात काय मिळत नाही, असा प्रश्न पडतो. अनेकजमांना रात्रीच्या प्रवासासाठी कारला कंपनीने दिलेले हेडलॅम्प पुरत नाहीत.त्यांना अतिरिक्त लाइट्सची आवश्यकता भासते. त्याची कारणेही आहेत. एकम्हणजे समोरून येणाऱ्या अनेक वाहनांचे प्रखर दिवे, त्यांनीही लावलेले अतिरिक्त लाइट्स, एसयूव्ही व टुरिस्ट गाड्यांनी लावलेले लाइट्स तसेच रस्त्याची स्थिती, सर्वसाधारण हेडलॅम्पमध्ये रस्त्याच्या न दिसणाऱ्या कडा, रस्त्याचा अंदाज न येण्यामुळे होणारी अडचण अशा अनेक कारणांमुळे अतिरिक्त हेडलाइट्स लावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये हे लाइट्स तसे अगदी ८०० रुपये जोडीपासून ५००० रुपयांपेक्षाही जास्त किंमतीचे व विविध प्रकारचे उपलब्ध आहेत. त्यात एलईडी लाइट्समुळे अतिरिक्त लाइट्स लावण्याचे प्रमाण वाढलेले दिलते. विशेष करून ग्रामीण भागांमधील वाहनचालक अशा लाइट्सचा आवर्जून वापर करतात.

आरटीओच्या नियमाप्रमाणे अशा प्रकारचे प्रखर लाइट्स लावण्यास खरे म्हणजे मनाई आहे,पण कोणीच कोणाला विचारीत नाही, अशी स्थिती आहे. इतकेच नव्हे तर ५५ w पेक्षा जास्त क्षमतेचेही बल्ब वापरण्यास मनाई आहे. तरीही अनेक कार्सना, एसयूव्ही व टुरिस्ट गाड्यांना त्यापेक्षा जास्त क्षमतेचे दिवे लावण्यास परवाना मिळाल्यासारखे दिवे वापरणारे ७० टक्के लोक आढळतील. मुळात हेडलॅम्पमध्ये पूर्वीपेक्षाही जास्त चांगले प्रकार आणि आरटीओ नियमांना धरून आणले गेल्यानंतर आपल्याला असणारा प्रकाशझोताचा अधिकाधिक वापर करण्याचा हव्यासही या सर्वांमागे कारणीभूत आहे. अतिरिक्त हेडलाइट्समध्ये ५५w क्षमतेचे दिवे लावलेले असतात, मात्र ते बदलून त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेचे दिवे लावणे व एका गाडीला अगदी ४ ते ६ लाइट लावणे हे प्रकारही केले जातात. त्यासाठी कटआऊट ही वेगळी इलेक्ट्रॉनिक वा स्वतंत्र अशी फ्यूज प्रणाली व वायरींग केले जाते. पूर्वी हे वायरींग स्वतंत्रपणे करावे लागे आता ते तयार मिळत आहे.

त्यामुळे तर कारच्या साधनसामग्रीमध्ये हे लाइट्स लावणे सर्रास झाले आहे. कारच्या बंपरला, किंवा अतिरिक्त बंपर लावून वा पुढे आडवा बार टाकून त्यावर हे अतिरिक्त हेडलाइट्स वा ऑफरोड लाइट्स लावण्याची पद्धत दिसून येते. विशेष करून रात्रीच्यावेळी समोरच्या वाहनाचे प्रखर लाइट्स सहन न होण्याचे प्रमाण वाढले गेले व विशेष करून छोट्या बसक्या आकाराच्या कारच्या ड्रायव्हर्सना त्याचा त्रास होऊ लागल्याने अतिर्कत् लाइट्चा वापर होऊ लागला. यामध्ये देशी व परदेशी अशा विविध गोल,चौकोनी आकाराचे हेडलाइट्स विकत मिळतात. त्यात रिफ्लेक्टर हा महत्त्वाचा घटक असतो. परदेशी कंपनीच्या लाइट्सना मागणी अधिक असली तरी त्यांच्या किंमती जास्त असल्याने सर्वांनाच त्या परवडतात असे नाही.

काहीजण तर रूफवरही आडवा बार टाकून हे लाइट्स वापरत आहेत. एकंदर या प्रकारच्या लाइट्सना आता अधिकृत स्वरूप आले आहे.ज्याच्याकडे लाइट्स नाहीत व आरटीओ नियमांप्रमाणे तो लाइट्स वापरतो, तो बापडा अनेकदा रात्री प्रवास करण्याचेही टाळतो. यासाठी एक तर नियमांची काटेकोर अंलबजावणी व्हायला हवी अन्यथा किमान सर्वांना सरसकट परवानगीही द्यायला हवी. रात्रीच्यावेळी ग्रामीण भागातील रस्त्यांवर मात्र एकंदर अशा प्रकारच्या लाइट्ची आवश्यकता खूप भासते,कारण त्या भागात असलेल्या अशा लाइट्सचा केलेला वापर हा मोठ्या प्रमाणात असल्याने व अनेकदा खडकाळ रस्त्यावर नेहमीचा हेडलाइ पुरेसा नसल्याने अनेकांची पंचाइत होते.वास्तविक रस्त्यावर योग्य चिन्हे, पांढऱ्या रंगाचा वापर करून काढलेल्या मार्गदर्शक रेषा,रस्त्याबाजूला असलेल्या झाडांना, पुलांच्या कठड्यांना आवश्यक तो रंग लावलेला असले तर सर्वसाधारण हेडलॅम्प पुरेसा असतो. मात्र अनेक ठिकाणी असे प्रकार हे नसल्याने लाइट्सचा अशा प्रकारचा प्रखर सहारा घेण्यावाचून तरणोपाय नाही, हेही खरे.

टॅग्स :carकारAutomobileवाहन