शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

महागड्या आणि डिझायनर दुचाकींसाठी प्रसिद्ध असलेली अमेरिकेतील कंपनी बनवणार इलेक्ट्रिक दुचाकी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 17:51 IST

अमेरिकेतील प्रसिद्ध दुचाकी कंपनी कंफेरेटेड मोटारसायकल आता इलेक्ट्रिक दुचाकी बनवणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकींच्या निर्मितीसाठी ही कंपनी कर्टिस मोटारसायकल्सच्या बॅनरखाली निर्मिती करणार आहे. निर्मिती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी कंपनीने झीरो मोटारसायकल्स कंपनीसोबत भागीदारी केली आहे.

नवी दिल्ली, दि. 5 - अमेरिकेतील प्रसिद्ध दुचाकी कंपनी कंफेरेटेड मोटारसायकल आता इलेक्ट्रिक दुचाकी बनवणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकींच्या निर्मितीसाठी ही कंपनी कर्टिस मोटारसायकल्सच्या बॅनरखाली निर्मिती करणार आहे. निर्मिती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी कंपनीने झीरो मोटारसायकल्स कंपनीसोबत भागीदारी केली आहे. झीरो मोटारसायकल्स कंपनीचा 100 पर्सेंट इलेक्ट्रिक स्ट्रीट आणि डर्ट बाइक्स बनवण्यामध्ये हातखंडा आहे.  आर्टिस्टिक आणि महागड्या दुचाकी बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कंफेडेरेट मोटारसायकल्सला कॉम्बॅक्ट मालिकेतील दुचाकींव्यतिरिक्त एक्स132 हेलकॅट आणि पी51 फायटर दुचाकींसाठी ओळखले जाते. भारताचा माजी कर्णधार आणि आघाडीचा क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीकडेसुद्धा मर्यादित निर्मिती झालेल्या हेलकॅट बाइक्स आहेत.  महागड्या आणि डिझायनर दुचाकी बनवणाऱ्या या कंपनीने आतापर्यंत जेवढ्या दुचाकींची निर्मिती केली आहेत. त्या सर्व मर्यादित आवृत्तीमधील आहेत. तसेच अनावरणाच्या वेळीच ही कंपनी निर्मितीच्या वेळीच विक्रीची अट ठेवत असते. सध्या या कंपनीची Confederate FA-13 ही दुचाकी विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच या प्रकारच्या केवळ 22 दुचाकीच  बनणार आहेत.  क्रूटीसची पहिली इलेक्ट्रिक बाइक एक शक्तिशाली क्रूझर असेल. जिचे नाव हर्क्युलस असेल. या बाइकमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर दिल्या जातील. ज्या झीरो मोटारसायकल्सकडूवन घेण्यात येतील. ही मोटार 175 पीएस पॉवरसोबत 393 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. मात्र या कंपनीकडून आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या किमतीबाबत खुलासा करण्यातल आलेला नाही.   पेट्रोल-डिझेलसारखे पारंपरिक उर्जेचे स्रोत हळूहळू संपुष्टात येत असल्याने पर्यायी उर्जेच्या स्रोतांचा शोध सुरू झाला आहे. त्यातच आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे अद्ययावत इलेक्ट्रिक कार निर्मिती शक्य होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या आठ वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात पेट्रोल पंप आणि पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवू लागेल, त्यामुळे ग्राहक आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवतील.   स्टॅनफोर्डचे इकॉनॉमिस्ट टोनी सीबा  म्हणतात,  जागतिक तेल कंपन्यांचा व्यापार 2030 पर्यंत शेवटच्या घटका मोजू लागेल. इलेक्ट्रिक कारचे यूग वाहतुकीला पूर्णपणे बदलून टाकेल, असेही टोनी यांनी आपल्या लेखात म्हटले होते.  स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रसिद्ध झालेल्या या अध्ययन अहवालात पुढील 8 वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील कार बंद होतील आणि नाइलाजास्तव लोक इलेक्ट्रिक कार आणि अॅटॉनॉमस व्हेईकल्सकडे वळतील, असेही नमूद करण्यात आले होते. 

टॅग्स :Automobileवाहन