शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त, बॅटरीशिवाय घेता येणार स्कूटर; धोरणाचा मसुदा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 14:30 IST

राज्यांच्या राजधानी, केंद्रशासित प्रदेश मुख्यालयांसह पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश केला जाईल, असे आयोगाने धोरणाच्या मसुद्यात म्हटले आहे...

नवी दिल्ली : नीती आयोगाने गुरुवारी बॅटरी स्वॅप (अदलाबदली) धोरणाचा मसुदा जारी केला. या अंतर्गत, पहिल्या टप्प्यात ४० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरांना बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.राज्यांच्या राजधानी, केंद्रशासित प्रदेश मुख्यालयांसह पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश केला जाईल, असे आयोगाने धोरणाच्या मसुद्यात म्हटले आहे. चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी शहरी भागात जागेची कमतरता लक्षात घेता, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्र बॅटरी स्वॅप धोरण आणणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात एक मजबूत आणि सर्वसमावेशक धोरण आराखडा तयार करण्यासाठी नीती आयोगाने फेब्रुवारी २०२२ मध्ये चर्चा सुरू केली होती. मसुदा सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर आयोगाने लोकांना ५ जूनपर्यंत सूचना देण्यास सांगितले आहे.

बॅटरी स्वॅपमुळे फायदा- बॅटरी स्वॅप व्यवस्था असलेली वाहने बॅटरीशिवाय विकली जातील. इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी वाहनाची किंमत कमी होईल. - मसुद्याच्या धोरणानुसार, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही ठिकाणी बॅटरी स्वॅप स्टेशन स्थापित करण्यास मुक्त आहे; परंतु यासाठी विहित तांत्रिक, सुरक्षा आणि मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारcarकार