शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एथर ते ओलापर्यंत... कोणत्या कंपनीने मे महिन्यात सर्वाधिक स्कूटर विकल्या? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 21:40 IST

Electric Scooter : मे महिन्यात विकल्या गेलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे आकडे बघून तुम्हाला समजेल की, बाजारात ग्राहकांमध्ये कोणत्या कंपनीच्या स्कूटरला सर्वाधिक मागणी आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ हळूहळू वाढत आहे. सध्या मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर आल्या आहेत. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गेल्या महिन्यात म्हणजेच मे 2023 मध्ये कोणत्या कंपनीने सर्वाधिक स्कूटर विकल्या आहेत. मे महिन्यात विकल्या गेलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे आकडे बघून तुम्हाला समजेल की, बाजारात ग्राहकांमध्ये कोणत्या कंपनीच्या स्कूटरला सर्वाधिक मागणी आहे.

एथर एनर्जी (Ather Energy)एथर एनर्जीने मागील महिन्याचा विक्री रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे, या बंगळुरूस्थित कंपनीने मे 2023 मध्ये 15 हजार 256 युनिट्स विकल्या आहेत.

ओला इलेक्ट्रिक (OLA Electric)गेल्या मे महिन्यात कंपनीने इतक्या स्कूटर विकल्या आहेत की, ओला इलेक्ट्रिक सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी बनली आहे. तुमच्या माहितीसाठी कंपनीने मे 2023 मध्ये 35 हजार इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत.

ओकाया (Okaya EV)ओकाया कंपनीने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरची बंपर विक्रीही केली आहे. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत 140 टक्क्यांनी विक्रीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 3 हजार 875 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बंपर विक्रीचे 'हे' कारण असू शकतेदरम्यान, गेल्या महिन्यात सरकारने जाहीर केले होते की, सरकार 1 जूनपासून FAME II सबसिडी कमी करणार आहे. अशा परिस्थितीत, सर्व कंपन्यांनी घोषणा केली आहे की, 1 जून 2023 पासून कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे मॉडेल महाग करतील. इतकेच नाही तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या 31 मे 2023 पर्यंत मोठ्या ऑफर्सही देत ​​होत्या. 31 मे पर्यंत ग्राहकांना बंपर डिस्काउंट देण्यात येत होते, त्यामुळे मे महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत वाढ होण्यामागे हे एक कारण असू शकते. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनscooterस्कूटर, मोपेड