शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Tata Nexon EV ला टक्कर देण्यासाठी येतेय Electric Mahindra XUV300!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 18:34 IST

SUV स्पेशलिस्ट कंपनी लोकप्रिय XUV300 चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याचा विचार करत आहे.

नवी दिल्ली : भारतात इलेक्ट्रिक कारचा सेगमेंट झपाट्याने वाढत आहे. नवीन कार खरेदी करणाऱ्यांना बॅटरीवर चालणारी वाहने खूप पसंतीला येत आहेत. या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचे वर्चस्व आहे. इलेक्ट्रिक SUV बद्दल बोलायचे झाले तर Tata Nexon EV सर्वात जास्त विकली जाते. मात्र, आता टाटा मोटर्सला टक्कर देण्यासाठी महिंद्रानेही तयारी केली आहे.

SUV स्पेशलिस्ट कंपनी लोकप्रिय XUV300 चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याचा विचार करत आहे. Mahindra XUV300 चे फेसलिफ्ट व्हर्जन देखील पुढील वर्षी लाँच केले जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी कारचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लाँच करण्याच्या तयारीत आहे. XUV300 EV चे डिझाइन आगामी XUV300 Facelift सारखे असू शकते. इलेक्ट्रिक कारच्या दृष्टिकोनातून महिंद्रा त्यात किरकोळ बदल करू शकते. आगामी काळात XUV300 EV ची थेट टक्कर Tata Nexon EV ला असू शकते.

सध्या  Mahindra XUV400 EV टाटाच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV Nexon EV ला टक्कर देत आहे. मात्र, ही कार बाजारात फारच कमी विकली जाते. नवीन XUV300 EV सह, महिंद्राला आशा आहे की, कंपनी इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये चांगली विक्री करेल. सध्या या सेगमेंटमध्ये Nexon EV ने ताबा घेतला आहे.

महिंद्रा XUV300 EV कार 35kWh बॅटरी पॅकच्या पॉवरसह बाजारात लाँच केले जाऊ शकते. ही XUV400 EV च्या 40kWh बॅटरी पॅकपेक्षा कमी पॉवरफुल आहे. मात्र, कंपनीने इलेक्ट्रिक मोटर किंवा रेंजबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. ही कार XUV400 EV पेक्षा कमी किमतीत लाँच केली जाऊ शकते.

महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक SUV साठी Nexon EV ला टक्कर देणे सोपे असणार नाही. Nexon चे टॉप इलेक्ट्रिक मॉडेल 12.3 इंच इंफोटेनमेंट स्क्रीनसह येते. XUV300 EV ची अपेक्षित एक्स-शोरूम किंमत 15 लाख ते 17 लाख रुपये असू शकते. महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार