शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक की पेट्रोल, कुठल्या कारच्या इंधनावर होतो कमी खर्च? कुठली कार अधिक किफायतशीर, समोर आली अशी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 13:23 IST

Petrol Vs Electric Car: जर तुम्हीसुद्धा एक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि इलेक्ट्रिक कार खरेदी करायची की पेट्रोलवरची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर पुढील प्रमाणे आहे.

गेल्या काही काळापासून भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना सरकार आणि कंपन्यांकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. पेट्रोलवर धावणाऱ्या कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारची रनिंग कॉस्ट खूप कमी असते. मात्र पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्ही कारची आपापली वैशिष्ट्ये आणि त्रुटी आहेत.

जर तुम्हीसुद्धा एक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि इलेक्ट्रिक कार खरेदी करायची की पेट्रोलवरची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुमचा संभ्रम दूर करू. तुम्ही दहा वर्षांपर्यंत कार चालवली. पेट्रोल कार आणि इलेक्ट्रिक कारवर किती खर्च येईल, हे आम्ही सांगणार आहोत. त्यामधून तुम्हाला कुठली कार खरेदी करावी, याचा अंदाज येईल.

येथे तुलनेसाठी आपण टाटा नेक्सॉनचं उदाहरण घेऊ, कारण ही कार पेट्रोल आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. टाटा नेक्सॉन पेट्रोलची किंमक ही ७.८० लाखांपासून सुरू होते. तर याच्या इलेक्ट्रिक व्हर्जनची किंमत १४.५० लाखांपासून सुरू होते.

पेट्रोलवरील कार १० वर्षे चालवण्यासाठी येणार खर्च पुढीलप्रमाणे आहेदररोजचा प्रवास - २० किमी मायलेज - १८.५ किमी प्रतिलिटर पेट्रोलची किंमत - १०२ रुपये वार्षिक प्रवास - ७,३०० किमी१० वर्षांमध्ये एकूण प्रवास - ७३,०० किमीप्रति किमी खर्च - ५.५५ रुपयेपेट्रोलवर वार्षिक खर्च - ४० हजार ५१५ रुपये१० वर्षांमध्ये पेट्रोलचा खर्च - ४ लाख ०५ हजार १५० रुपये

इलेक्ट्रिक कार १० वर्षे चालवण्यावरील खर्च दररोजचा प्रवास - २० किमी कारची रेंज - ३१२ किमी/चार्जइलेक्ट्रिसिटी टॅरिफ - ८ रुपये/युनिट (३० युनिट फुल चार्ज करण्यासाठी २४० रुपये)वार्षिक प्रवास - ७३०० किमी १० वर्षांमध्ये एकूण प्रवास ७३ हजार किमीप्रति किलोमीटर खर्च ०.९० रुपयेचार्जिंगमध्ये वार्षिक खर्च - ६ हजार ५४० रुपये१० वर्षांमध्ये चार्जिंगवर खर्च - ७८ हजार ४८९ रुपये

खर्चाचे आकडे पाहिल्यास पेट्रोलवर धावणाऱ्या कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार चालवण्याचा खर्च खूप कमी आहे. जर दरवर्षी ८ टक्क्यांच्या हिशेबाने पेट्रोलची किंमत वाढली, तर पेट्रोल कारला १० वर्षे चालवण्यासाठी ६ लाख ३३ हजार ६६० रुपये खर्च येईल. तर दरवर्षी ४ टक्क्यांच्या हिशोबाने विजेची किंमत वाढली तर १० वर्षांत इलेक्ट्रिक कारवर ८१ हजार ६७०.४२ रुपये खर्च येईल.

टाटा नेक्सॉन ईव्हीच्या बॅटरीवर कंपनी ८ वर्षांची गॅरंटी देत आहे. ८ वर्षांनंतर बॅटरी खराब झाल्यास नव्या बॅटरीवरील खर्च हा सुमारे ७ लाख रुपये एवढा येतो. तर जुनी झाल्यावर कारच्या किमतीमध्येही घट होते. ४ ते ५ वर्षांनंतर कारची किंमत ही ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत कमी होते.

सुरुवातील इलेक्ट्र्रिक कार खरेदी करण्यात थोड्या अडचणी येऊ शकतात. कारण ही कार थोडी महाग आहे. मात्र ही कार चालवण्यासाठी येणारा खर्च हा खूप कमी आहे. भारतामध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. मात्र पर्यावरण अनुकूल असल्याने त्याला खूप पाठबळ मिळत आहे.  

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारPetrolपेट्रोलelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर