शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एकदा चार्ज करा आणि 200 KM पर्यंत चालवा, 2 तासांत पुन्हा चार्ज; लुकमध्येही ढासू आहे 'ही' बाइक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 10:22 IST

बाइकसाठी वापरण्यात आलेली बॅटरी 2 तासांत फुल चार्ज केली जाऊ शकते. गाडीचा बॅटरी पॅक मॅक्झिमम हिट एक्सचेन्ज टेक्नॉलीजीसह आलेले आहे. यामुळे बॅटरी थंड राहते आणि दुचाकीचा वेग कायम राहतो.

नवी दिल्ली - भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे आणि रोजच्या रोज नवीन स्टार्टअप्स त्यांची इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत. यातच एक आहे ओबेन. ओबेन येणाऱ्या काही आठवड्यांतच इलेक्ट्रिक दुचाक्यांच्या सेगमेंट मध्ये एन्ट्री करेल. ही मोटरसायकल स्पोर्टी आहे आणि तिला काही रेट्रो टचदेखील देण्यात आले आहेत. या ई-बाईकला लाल आणि काळा असा ड्युअल टोन कलर देण्यात आला आहे. लॉन्चच्या वेळी कंपनी या दुचाकी आणखी काही रंगांत लॉन्च करू शकते.

एका फुल चार्जमध्ये 200 किमीपरंयत रेंज -ओबेन इलेक्ट्रिक बाइक आरामदायक असून ती प्रिमियम रायडिंग स्टांससह लॉन्च होन्याचा अंदाज आहे. ही बाइक दिसायला छोट्या आकाराची आहे. तसेच चांगल्या कंट्रोलिंगच्या दृष्टीने तिचे सीट बनवण्यात आले आहे. या बाइकचा ग्राउंड क्लियरन्सदेखील फारच सुंदर आहे. यामुळे शरांतील रस्त्यांबरबोबरच ती ऑफ-रोडही चालविली जाऊ शकते. सर्वसाधारण दुचाकींच्या तुलनेत हिचा ग्राउंड क्लियरन्स फारच छान आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही ई-बाइक 200 किमीपर्यंत चालविली जाऊ शकते. हिची रेंज रिव्होल्ट आणि ओला टू-व्हीलर्सपेक्षा अधिक आहे.

2 तासांच चार्ज होते बॅटरी - या इलेक्ट्रिक बाइकची टॉप स्पीड 100 किमी/तास एवढी आहे. तर 3 सेकंदांत ही 0-40 किमी/तास एवढा वेग घेते. बाइकसाठी वापरण्यात आलेली बॅटरी 2 तासांत फुल चार्ज केली जाऊ शकते. गाडीचा बॅटरी पॅक मॅक्झिमम हिट एक्सचेन्ज टेक्नॉलीजीसह आलेले आहे. यामुळे बॅटरी थंड राहते आणि दुचाकीचा वेग कायम राहतो. इलेक्ट्रिक बाइकला आयओटी सारखे कनेक्टिव्हिटी फीचर सर्वसामान्यपणे मिळू शकतात. युजर्स हिच्या रेंजचा डेटा पाहू शकतात आणि आपल्या राइड्सचे एनालिसिस करू शकतात.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईकAutomobileवाहन