शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर आली; 210 किमीचा वेग पकडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 5:23 PM

पुढील 12 वर्षांत भारतात इलेक्ट्रीक वाहनांचे लक्ष्य ठेवणाऱ्या सरकारसाठी एका चांगली बातमी आहे.

पुढील 12 वर्षांत भारतात इलेक्ट्रीक वाहनांचे लक्ष्य ठेवणाऱ्या सरकारसाठी एका चांगली बातमी आहे. सर्वाधिक खपाच्या दोन कार अल्टो आणि वॅगन आर या आता विजेवर चालणार आहेत. मात्र, या कार मारुती सुझुकी नाही तर एक स्टार्टअप कंपनी विकणार आहे. धक्का बसला ना, खरे आहे. 

इलेक्ट्रीक कार बनविण्यासाठी कंपन्यांनी कंबर कसली आहे. मात्र, लोकांनी या कार महागड्या असणार असल्याने धास्ती घेतली आहे. यामुळे अल्टो आणि वॅगनआर सारखी खिशाला परवडणारी कार जर विजेवर चालणारी असेल तर त्यांना दिलासा मिळणार आहे. या दोन्ही कार पेट्रोलवर चालणाऱ्या कार आहेत. तेलगानाच्या E-trio Automobiles या स्टार्टअप कंपनीने मारुतीची आणि एआरएआयची परवानगी घेऊन दोन्ही कार विजेवर चालण्यासाठी तयार केल्या आहेत. यामुळे सध्याच्या कारचे काय होणार हा प्रश्नही काहीसा निकाली निघाला आहे. E-trio ही ARAI ची मान्यता मिळालेला पहिली कंपनी आहे. 

E-trio ही कंपनी सध्याच्या IC इंजिन वाल्या कारवर काम करत आहे. यामुळे महागड्या इलेक्ट्रीक कार घेण्यापेक्षा वाहनमालक त्यांच्याकडील वापरातील कारमध्ये आवश्यक बदल करून विजेवर चालवू शकणार आहेत. 

सध्या ही कंपनी Alto आणि WagonR या कारला विजेवर चालविण्याची सेवा देत आहे. या कारची दोन वर्षांपासून चाचणी सुरु आहे. E-trio ने सांगितले की या वाहनांना गिअरची गरज राहत नाही. रेट्रोफिट किट बसविल्यानंतर या कार 150 किमीच्या वेगाने धावतात. चाचणीवेळी या कारनी तब्बल 210 किमीचा वेग पकडला होता. 

अल्टो आणि वॅगन आरवरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कंपनी अन्य कंपन्यांच्या कारना विजेवर चालविण्यासाठी परवानगीची वाट पाहत आहे. या कंपनीची सध्या दर महिन्याला 1000 कार रेट्रोफिट करण्याची क्षमता आहे. पुढील वर्षी हा आकडा 5000 करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारMaruti Suzukiमारुती सुझुकीMaruti Suzuki e-Survivorमारुती सुझुकी फ्यूचर एस कन्सेप्टcarकार