शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर EeVe Soul लाँच, कमी बजेटमध्ये जबरदस्त रेंज आणि फीचर्स, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 14:55 IST

EeVe Soul: ही ई-स्कूटर 3 ते 4 तासात 100 टक्के चार्ज होऊ शकते. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड 60 किमी प्रतितास आहे.

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ईव्ही इंडियाने (EeVe India) इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल सोल (Soul) लाँच केले आहे. हे मॉडेल मंगळवारी नवी दिल्लीत लाँच करण्यात आले. ही ई-स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यावर 120 किमी पर्यंत धावू शकते. ही ई-स्कूटर 3 ते 4 तासात 100 टक्के चार्ज होऊ शकते. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड 60 किमी प्रतितास आहे. नवीन EeVe Soul स्कूटरची किंमत 1,39,000 हजार रुपये (ऑन रोड) इतकी आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, भारतात प्रथमच उच्च श्रेणीतील युरोपियन तंत्रज्ञानाने बनवलेल्या स्कूटर्स लाँच केल्या जात आहेत. हे एक उत्तम ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करेल, परंतु देशातील इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याच्या संस्कृतीला देखील प्रोत्साहन देईल. देशाचे भविष्य लक्षात घेऊन कंपनीने हायस्पीड इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे.

ईव्ही इंडिया लाँच करताना, कंपनीचे सह-संस्थापक आणि संचालक हर्षवर्धन डिडवानिया म्हणाले, "ईव्ही इंडिया भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने काम करत आहे. यामुळे देशाला वायू प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना आणि समस्यांवर मात करण्यास मदत होईल. भविष्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जा संसाधने सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही इको फ्रेंडली ई-स्कूटर्स लाँच करत आहोत. हे ई-स्कूटर्स उत्कृष्ट स्थिरीकरण उपायांनी सुसज्ज आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या आधुनिक ई-स्कूटर्स हायस्पीड आणि स्टायलिश आहेत. त्या कोणत्याही समस्येशिवाय चालविले जाऊ शकतात. यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास आणि वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा भार कमी होण्यास मदत होईल."

80 कोटी रुपयांची गुंतवणूकडिडवानिया म्हणाले, "सध्या जगभरातील ऑटोमोबाईल उद्योग बदलाच्या एका टप्प्यातून जात आहे. सर्व लोक वेगाने इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वळत आहेत. जगाच्या गतीने भारतानेही या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्याचा विचार करता दुचाकी वाहनांना प्रवासाकडे वळवण्याचा ट्रेंड, ईव्ही इंडियाचे उद्दिष्ट आहे की इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या क्रांतीमध्ये थोडासा हातभार लावावा." दरम्यान, ईव्ही इंडियाने ई-स्कूटर भारताच्या हाय-स्पीड दुचाकी उत्पादनासाठी संशोधन, डिझाइन, उत्पादन, धोरणात्मक भागीदारी, पुरवठा साखळी आणि पार्टनरशिपमध्ये सुमारे 80 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन आणखी वाढेल.

EeVe Soul खासियतनवीन लाँच झालेल्या स्कूटरच्या खासियतबद्दल डिडवानिया म्हणाले, "सोल ही एक पूर्ण लोडेड आयओटी लॅस हाय-स्पीड स्कूटर आहे. इतर फीचर्समध्ये अँटी थेफ्ट लॉक सिस्टम, जीपीएस नेव्हिगेशन, यूएसबी पोर्ट, कीलेस एक्सपीरियन्स, रिव्हर्स मोड, सेंट्रल ब्रेकिंग सिस्टम, जिओ टॅगिंग आणि जिओ फेन्सिंग यांचा समावेश आहे. या स्कूटरला तीन वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. तसेच, स्कूटर अॅडव्हॉन्स लिथियम फेरस फॉस्फेट (LFP) बॅटरीसह सुसज्ज आहे, जे बदलले जाऊ शकते आणि वेगळे सुद्घा केले जाऊ शकते. या ई-स्कूटर्सना 3 ते 4 तासात 100% पर्यंत चार्ज करता येईल. कमाल वेग 60 किमी प्रतितास आहे. एकदा चार्ज केल्यांनतर 120 किमी पर्यंत चालवता येऊ शकते. 

20 लाख युनिट्सची निर्मिती करण्याचे लक्ष्यकंपनीने 2027 पर्यंत 20 लाख इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ई-स्कूटरचे उत्पादन युनिट 100 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. स्कूटर्सच्या निर्मितीमध्ये आधुनिक युरोपियन आणि पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन संयंत्र उत्पादन, चाचणी, वाहन असेंबलिंग आणि ऑन लाइन चाचणीसाठी एकात्मिक इको-सिस्टमचा अवलंब केला जातो.

20 राज्यांमध्ये ईव्ही इंडियाईव्ही इंडिया हा भारत ग्रुपचा एक भाग आहे, ज्याला मोबाईल आणि लॉजिस्टिक उद्योगात 80 वर्षांचा वारसा लाभला आहे. याची 2019 मध्ये लाँचिंग करण्यात आली होती. ईव्ही इंडिया अलीकडेच इलेक्ट्रिक व्हेइकल्स सेगमेंटमधील सर्वात आघाडीवर आणि वेगाने वाढणारी ई-स्कूटर म्हणून उदयास आली आहे. कंपनीने 20 राज्यांमधील 100 हून अधिक शहरांमध्ये आपली उपस्थिती नोंदवली आहे. कंपनीचे 100 हून अधिक डीलर्स आणि 50 सब-डीलर्सचे नेटवर्क आहे. ईव्ही इंडिया भारतातील सर्वात मोठे ऑपरेशनल मॅन्युफॅक्चरिंग युनिट भुवनेश्वर, ओडिशा येथे आहे, जे सुमारे 2000 लोकांना रोजगार देते. कंपनी भविष्यात प्रदूषणमुक्त मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनAutomobileवाहनbusinessव्यवसाय