शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ई-दुचाकी हाेणार महाग; केंद्र सरकारने घटविली सबसिडी, ५ हजारांपर्यंत माेजावी लागेल जास्त रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 13:41 IST

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवरील सबसिडी प्रति किलोवॅट तास १५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये केली ...

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवरील सबसिडी प्रति किलोवॅट तास १५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये केली आहे. तसेच एक्स-फॅक्ट्री प्राईसवरील सबसिडीची मर्यादा ४० टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ई-दुचाकीसाठी ५ हजार रुपयांपर्यंत जास्त रक्कम माेजावी लागेल.

इलेक्ट्रिक दुचाकींसाठी देण्यात आलेला सबसिडीचा निधी संपलेला आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. या तरतुदीतील ८० टक्के निधी १० लाख वाहनधारकांना देण्यात आला आहे. सध्या ईव्ही उत्पादकांना १७ हजार ते ६६ हजार रुपयांची सबसिडी दिली जात आहे. नव्या अधिसूचनेनंतर ती घटून १५ हजार ते २० हजार रुपये होईल. वर्ष २०२३ मध्ये विकलेल्या ईव्हींमध्ये दुचाकींची ६० टक्के एवढी हिस्सेदारी आहे. फेम-२ याेजनेला मार्च २०२४ नंतर मुदत वाढ देण्याचा किंवा फेम-३ याेजना आणण्याचा काेणताही प्रस्ताव नाही.

किती मिळते सबसिडी?३०,००० रुपये दुचाकीवर.१,५०,००० रुपये चार चाकीवर.१,५०,००० रुपयांपर्यंत दुचाकीची किंमत हवी. १५ लाख रुपयांपर्यंत चार चाकी वाहनाची किंमत हवी.

भारतात ई-वाहनांची विक्री आर्थिक वर्ष    संख्या २०२३    ११,७१,९४४ २०२२    ४,५८,७४६२०२१    १,४२,३१४२०२०    १,७३,५४५२०१९    १,४६,९३८

७,२०,००० इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये झाली. 

काेणाला मिळताे लाभ?- ताशी ४० किलाेमीटर ई-दुचाकीचा किमान वेग हवा.- लिथियम-आयन बॅटरीचा वापर झाला पाहिजे.- ८० किलाेमीटर किमान रेंज हवी सिंगल फुल चार्जवर.- ५० टक्क्यांहून अधिक साहित्याची निर्मिती देशांतर्गत हवी.

३,८८९.९४ कोटी रुपये झाले खर्चमार्च २०२४ मध्ये फेम-२ योजना संपणार आहे. योजनेची एकूण तरतूद १० हजार कोटी रुपयांची होती. दरवर्षी २ हजार कोटी रुपयांची सबसिडी यात दिली जाणार होती. यंदा अर्थसंकल्पात हा निधी वाढवून ५,१७२ कोटी करण्यात आला होता. त्यातील ३,८८९.९४ कोटी रुपये आता खर्च झाले आहेत. 

बिगर सबसिडी बाजाराची तयारीसूत्रांनी सांगितले की, इलेक्ट्रिक दुचाकींचा बाजार आता गती घेत आहे. त्यामुळे सबसिडी कमी करून सरकारचा पैसा वाचू शकतो. तसेच बिगर सबसिडीच्या बाजाराची तयारीही होऊ शकते. सबसिडीला सुरुवात झाली तेव्हा फेम-२ अन्वये ती १० हजार रुपये प्रति किलोवॅट तास इतकी होती. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईक