तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 15:17 IST2025-09-19T15:16:40+5:302025-09-19T15:17:26+5:30

पहिल्यांदाच डीलर्सकडून त्यांच्या त्यांच्या बोलल्या जाणाऱ्या अशा ९ भाषांमध्ये प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या.

Do you trust Maruti, Hyundai, Tata but not their dealers? These companies are not among them... | तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...

तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...

तुमच्यासाठी विश्वासार्ह वाहन कंपनी कोणती, १० मध्ये ७-८ जण तरी मारुतीचे नाव घेतील. एखाद दुसरा ह्युंदाई, टाटाचे नाव घेईल. परंतू, तुम्हाला जे लोक वाहन विकतात, ते डीलर कोणत्या कंपन्यांवर विश्वास ठेवतात, हे जर समजले तर तुमचा त्यावर विश्वासही बसणार नाही. कारण डीलरच्या विश्वासार्ह कंपन्यांमध्ये तुम्ही ज्या कंपन्यांवर विश्वास ठेवता त्या नाहीत. 

सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशन्स (FADA) ने सिंगापूरची कन्सल्टिंग फर्म प्रीमोनएशियासोबत मिळून डीलर सॅटिस्फॅक्शन स्टडी २०२५ चे सर्व्हेक्षण केले आहे. या सर्वेचा रिपोर्ट १० सप्टेंबरला ७ व्या ऑटो रिटेल कॉन्क्लेव्हमध्ये जारी करण्यात आला. या सर्व्हेमध्ये देशभरातील १८०० हून अधिक डीलर आणि ५००० हून अधिक आऊटलेट्सकडून माहिती गोळा करण्यात आली होती. 

पहिल्यांदाच डीलर्सकडून त्यांच्या त्यांच्या बोलल्या जाणाऱ्या अशा ९ भाषांमध्ये प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या. यंदा या इंडस्ट्रीचा समाधान स्कोअर ७८१ होता. गेल्यावर्षीपेक्षा १३ ने जास्त. यामध्ये कारच्या सेगमेंटमध्ये ८६८ गुणांसह जेएसडब्ल्यू एमजी मोटर्सचा पहिला क्रमांक आला आहे. डीलरनी सर्वाधिक पसंती एमजीला दर्शविली आहे. तर महिंद्राला ८३२ गुण व टाटाला ८१२ गुण मिळाले आहेत. किया आणि ह्यांदाईला देखील ७४० गुण मिळाले आहेत. परंतू, विक्रीत टॉपर असलेली मारुती डीलरच्या विश्वासार्हतेत खूप मागे पडलेली आहे. मारुती सुझुकीला ७२७ गुण मिळाले आहेत. 

दुचाकी क्षेत्रात देखील अशीच उलथापालथ झालेली आहे. हिरो, होंडा सारख्या कंपन्या मागे पडल्या असून रॉयल एनफील्डने बाजी मारली आहे. आरईला ८५२ अंक मिळाले आहेत. तर हिरोला ८१७, होंडाला ७४७ आणि टीव्हीएसला ६३२ गुण मिळाले आहेत. कमर्शियल व्हेईकलमध्येही टाटाला पहिला नंबर पटकावता आलेला नाही. अशोक लेलँडने ७८६ गुण मिळवत पहिले स्थान मिळविले आहे. 
 

Web Title: Do you trust Maruti, Hyundai, Tata but not their dealers? These companies are not among them...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.