शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

Samruddhi Mahamarg: ७ सेकंदात १००चा स्पीड, ९ एअरबॅग; ‘समृद्धी’वर फडणवीसांनी चालवलेल्या कारची किंमत ऐकून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 8:57 PM

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत असलेली कार लक्षवेधी ठरल्याचे सांगितले जात आहे. नेमकी कोणती होती ही कार? तुम्हीच पाहा...

Devendra Fadnavis Drove Mercedes Car On Samruddhi Mahamarg: राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या समृद्धी महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाच्या एका टप्प्याचे लोकार्पण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे आणि फडणवीस यांनी या महामार्गावरून एक फेरफटका मारला. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी कारचे सारथ्य करत, नागपूर ते शिर्डी असा ५२९ किमीचा प्रवास अवघ्या काही तासांत पूर्ण केला. 

देवेंद्र फडणवीस यांचे समृद्धी महामार्गावर कार चलावतानाचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच अनेकांना प्रश्न पाडला आहे की, देवेंद्र फडणवीस चालवत असलेली ही कार नेमकी कोणती आहे? देवेंद्र फडणवीस चालवत असलेली ही कार आहे Mercedes-Benz G350d. 

Mercedesची महागडी पण दमदार कार

Mercedes G350d मध्ये ३.० लिटर ६ सिलेंडर असलेले डिझेल इंजिन आहे. हे इंजिन ९-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह देण्यात आले आहे. मर्सिडीज जी-क्लास ऑफ-रोडिंगसाठी प्रसिद्ध कार आहे. ही कार फक्त ७.४ सेकंदात १०० किमी/ताशी वेग पकडू शकते. Mercedes G350d या कारला २० इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत. तर या कारचा ग्राउंड क्लियरन्स २४१ मिमी आहे. 

९ एअरबॅग्जचे सुरक्षा कवच अन् भन्नाट फिचर्स

Mercedes G क्लास कारमध्ये थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, ९ एअरबॅग्ज, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखे अनेक भन्नाट फीचर्स उपलब्ध आहेत. Mercedes G350d या कारमध्ये कंपनीने कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी फीचरसह फॅक्टरी फिट फीचर देणारी देशातील पहिली मर्सिडीज कार आहे. यात दोन १२.३ इंच डिस्प्ले, ड्रायव्हर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. Mercedes G350d या कारची एक्स शोरूम किंमत २.०२ कोटी इतकी आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे