शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी वाढणार; ग्लोबल रिसर्चचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 06:42 IST

येत्या काही दिवसांमध्ये अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे ज्या वाहनांच्या मेन्टेनन्सचा खर्च कमी येतो, त्यांनाही ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. 

नवी दिल्ली : गेल्या १५ महिन्यांमध्ये देशातील पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये ३५ टक्के वाढ झाली असून, हा खर्च खिशाला परवडेनासा झाल्यामुळे ग्राहक आता अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांचा शोध घेऊ लागले आहेत. परिणामी येत्या काही दिवसांमध्ये अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे ज्या वाहनांच्या मेन्टेनन्सचा खर्च कमी येतो, त्यांनाही ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. एचएसबीसी ग्लोबल रिसर्च रिपोर्टनुसार देशातील इंधनाचे वाढते दर हे सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. यामुळे ज्यांच्याकडे सध्याचे वाहन आहे, त्यांना त्याचा खर्च परवडेनासा झाला आहे, तर नवीन वाहन खरेदी करू इच्छिणारे लोक हे अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनाला पसंती देत आहेत. याशिवाय ज्या वाहनांना मेन्टेनन्स कमी लागतो, त्यांनाही मागणी वाढत आहे. १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे वाहन खरेदी करणाऱ्यांचा या अहवालात अभ्यास करण्यात आला असून, त्यांच्याकडून या दोन्ही बाबींना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले आहे.पेट्रोल, डिझेलचे दर विमान इंधनापेक्षा जास्तदेशातील पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असून, ते विमानाच्या इंधनापेक्षा ३० टक्क्यांनी जास्त झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये होत असलेली वाढ चालूच असून रविवारी या दोन्ही इंधनांचे दर ३५ पैसे प्रति लीटर असे वाढविण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १११.७७ रुपये प्रति लीटर झाले असून डिझेलही लीटरला १०२.५२ रुपयांवर पोहोचले आहे. सध्या दिल्लीमध्ये विमानाच्या इंधनाचे दर ७९,०२०.१६ रुपये प्रति किलोलीटर असे आहेत. याचा अर्थ एका लिटरला या इंधनाचा दर ७९ रुपये आहे. मात्र, आता दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर १०५.८४ रुपये प्रति लिटर झाला आहे. याचाच अर्थ पेट्रोल विमानाच्या इंधनापेक्षा ३० टक्क्यांनी महाग आहे.या दरवाढीमुळे आता सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या पुढे गेले आहे. तसेच किमान डझनभर राज्यांमध्ये डिझेलच्या दराने शतक पार केले आहे. गेल्या तीन सप्ताहांमध्ये पेट्रोलच्या दरात १६व्या तर डिझेलमध्ये १९ व्या वेळी वाढ झाली आहे. 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढAutomobileवाहन