शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हायटेक फिचर्स असलेली Deltic Drixx इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 100 KM रेंजचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 14:20 IST

Deltic Drixx : जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर डेल्टिक ड्रिक्स इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज, टॉप स्पीड, ब्रेकिंग सिस्टम यासह सर्वकाही जाणून घ्या...

नवी दिल्ली : सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसून येत आहे. यातच अशी एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये जास्त रेंज देऊ शकेल. ही Deltic Drixx इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कमी बजेटमध्ये जास्त रेंज, हलके वजन आणि फीचर्समुळे या इलेक्ट्रिक स्कूटरला बाजारात चांगली मागणी आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर डेल्टिक ड्रिक्स इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज, टॉप स्पीड, ब्रेकिंग सिस्टम यासह सर्वकाही जाणून घ्या...

किंमत किती?डेल्टिक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 55,490 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि टॉप मॉडेलपर्यंत जाऊन या स्कूटरची किंमत 71,990 रुपये होईल.

स्कूटरची बॅटरीया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 60.8 V, 26Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे. या बॅटरीमध्ये 250 W पॉवरची BLDC इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. या बॅटरी पॅकवर कंपनी 3 वर्षांची वॉरंटी देते.

राइडिंग रेंज आणि टॉप स्पीडकंपनीचा दावा आहे की, एकदा फुल चार्ज केल्यावर ही स्कूटर 70 ते 100 किलोमीटरची रेंज देते आणि या रेंजसोबत कंपनी ताशी 25 किलोमीटरच्या टॉप स्पीडचा दावा करते.

ब्रेकिंग सिस्टमब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने स्कूटरच्या फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हीलमध्ये ड्रम ब्रेक्स बसवले आहेत, ज्यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर स्कूटरच्या फ्रंटमध्ये हायड्रॉलिक टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि रिअरमध्ये हायड्रॉलिक स्प्रिंग मोनोशॉक सस्पेन्शन आहे.

फीचर्स काय आहेत?डेल्टिक ड्रिक्सवर ऑफर केलेल्या फीचर्समध्ये रिमोट स्टार्ट, पुश बटन स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अँटी थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, सेंट्रल लॉकिंग, फाइंग माय स्कूटर, रिव्हर्स मोशन स्विच, कीलेस स्टार्ट अँड स्टॉप, एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि डीआरएल यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobile Industryवाहन उद्योग