शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:26 IST

Citroen C3 च्या सामान्य व्हेरिअंटपेक्षा २१ हजार रुपयांनी या स्पोर्ट एडिशनची किंमत जास्त ठेवण्यात आली आहे.

सिट्रोएनने हॅचबॅक कार सी ३ चे नवीन स्पोर्ट एडिशन भारतीय बाजारात आणले आहे. यामध्ये कंपनीने थोडेसे हायटेक होण्याचा प्रयत्न केलेला आहे. साडे सहा लाखांमध्ये कंपनीने सिट्रॉएन सी थ्रीला नवीन लुक दिला असून तरुणांना लक्षात घेऊन ते डिझाइन करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 

Citroen C3 च्या सामान्य व्हेरिअंटपेक्षा २१ हजार रुपयांनी या स्पोर्ट एडिशनची किंमत जास्त ठेवण्यात आली आहे. एवढेच नाही तर आणखी १५ हजार रुपये मोजले तर तुम्हाला या कारसोबत डॅशकॅम आणि वायरलेस चार्जर मिळणार आहे. याला सिट्रॉएनने टेक किट असे म्हटले आहे. C3 स्पोर्ट एडिशनमध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. १.२-लिटर प्युअरटेक ८२ नॅचरली एस्पिरेटेड इंजिन देण्यात आले असून ८१ बीएचपी पॉवर आणि ११५ एनएम टॉर्क प्रदान करते. यामध्ये ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 

दुसऱ्या इंजिन पर्यायामध्ये १.२-लिटर प्युअरटेक ११० टर्बो इंजिन देण्यात आले आहे. जे १०८ बीएचपी पॉवर आणि २०५ एनएम टॉर्क देते. यामध्ये ज्यांना इंजिनमध्ये ताकद जास्त हवीय ते या पर्यायाकडे वळू शकतात, परंतू मायलेज थोडे कमी मिळणार आहे. कंपनीने १८.३ किलोमीटर प्रति लिटर ते १९.३ किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देण्याचा दावा केला आहे. ऑटोमॅटिक टर्बो व्हर्जन फक्त १० सेकंदात ० ते १०० किमी प्रति तासाचा वेग गाठते.

स्पोर्टी लुक येण्यासाठी कंपनीने व्हिज्युअल अपग्रेड्स केले आहेत. कारच्या बॉडीवर 'स्पोर्टी' स्टीकर दिले आहेत. याचबरोबर यात नवीन गार्नेट रेड रंगही देण्यात आला आहे, जो सिट्रॉईन सीथ्री मध्ये पहिल्यांदाच आला आहे. आतमध्ये स्पोर्टी फील येण्यासाठी रेस-प्रेरित पेडल्स, सीटबेल्ट कुशन आणि विशेष सीट कव्हर्स बसवण्यात आले आहेत. केबिनमध्ये अॅम्बियंट लाइटिंग देखील देण्यात आली आहे. 

टॅग्स :Citroen Indiaसिट्रॉन