शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Citroen C5 Aircross भारतात लाँच; जाणून घ्या, किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनचे संपूर्ण डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 16:46 IST

Citroen C5 Aircross Facelift 2022 Launch In India : नवीन Citroen C5 Aircross फेसलिफ्टच्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यामध्ये 2.0 लीटर डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 177 PS पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

नवी दिल्ली : सिट्रोनने (Citroen) भारतीय बाजारपेठेत आपली नवीन मध्यम आकाराची SUV Citroen C5 Aircross लाँच केली आहे. कंपनीने कारच्या डिझाइनमध्ये फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमध्ये अनेक मोठे बदल सादर केले आहेत. Citroen ने ही मध्यम आकाराची SUV ड्युअल टोनसह फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे, ज्याची किंमत 36.67 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

नवीन Citroen C5 Aircross फेसलिफ्टच्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यामध्ये 2.0 लीटर डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 177 PS पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत कंपनीने 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला आहे. Citroen C5 Aircross च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही कार 17.5 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज देते. रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच या इंजिनसह एक माइल्ड हायब्रिड इंजिन असलेले व्हर्जन देखील लाँच करू शकते.

Citroen C5 Aircross मध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यामध्ये 10-इंच फ्री स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात आले आहे, जे पूर्वी 8 इंच होते. या इन्फोटेनमेंट सिस्टमच्या तळाशी क्यूब-डिझाइन केलेले एसी व्हेंट्स बसवण्यात आले आहेत. याशिवाय, इलेक्ट्रिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, 12.3-इंच डिजिटल ड्रायव्हर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल सीट, टच बेस्ड शॉर्ट कीज, पॉवर ड्रायव्हर सीट, हँड्स फ्री टेलगेट ओपनिंग यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी सीट्स सुरक्षेच्या दृष्टीने हायवे ड्रायव्हर असिस्ट, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, हँड्स फ्री पार्किंग, सहा एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ADAS आणि 1630 लिटरपर्यंत वाढवता येणारी 580 लीटरचे बूट स्पेस यांसारखी फीचर्स जोडण्यात आली आहेत. सीटिंग प्लॅनबद्दल सांगायचे तर आधीसारखेच कंपनीने दुसऱ्या रांगेत तीन वेगवेगळ्या स्लाइडिंग आणि रिक्लाइनिंग फीचर्ससह सीट्स बसविल्या आहेत. याशिवाय, या एसयूव्हीमध्ये पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी सीट्स बसवण्यात आल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत उतरल्यानंतर Citroen C5 Aircross एसयूव्ही जीप कंपास, ह्युंदाई टक्सन, फोक्सवॅगन टिगन यांसारख्या प्रीमियम एसयूव्हींना टक्कर देण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगCitroen Indiaसिट्रॉन