शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
2
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
3
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
4
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
5
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ५ जण दगावल्याची भीती
6
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
7
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
8
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
9
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
10
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
11
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
12
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
13
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
14
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
15
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
16
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
17
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
18
Pawan Singh : "सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी
19
722847400000 रुपयांची बंपर कमाई...! टीसीएस, इन्फोसिसनं रिलायन्सला मागं टाकलं, गेल्या आठवड्यात ही कंपनी राहिली आघाडीवर
20
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:45 IST

एका महिलेचा एअर बॅग फुटल्याने मृत्यू झाल्याने कंपनीने ही वॉर्निंग जारी केली आहे. भारतात अद्याप अशाप्रकारची कोणतीही सूचना किंवा अलर्ट देण्यात आलेला नाहीय.

काही वर्षांपूर्वी भारतात आलेल्या युरोपची सिट्रोएन कंपनीने युरोपमध्ये सी ३ ही कार चालविण्याचे थांबविण्यास सांगत आहे. सिट्रोएनने सी ३ आणि डीएस३ या कार तातडीने वापरण्याचे थांबवण्यास सांगितले आहे. एका महिलेचा एअर बॅग फुटल्याने मृत्यू झाल्याने कंपनीने ही वॉर्निंग जारी केली आहे. भारतात अद्याप अशाप्रकारची कोणतीही सूचना किंवा अलर्ट देण्यात आलेला नाहीय.

Citroen (सिट्रोएन) ही फियाटची ग्रुप कंपनी आहे. या कंपनीसह बहुतांश कंपन्यांच्या कारमध्ये टकाटा कंपनीच्या एअरबॅग बसविलेल्या असतात. त्या अपघात झाला की उघडतात आणि आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना पुढे आदळण्यापासून वाचवितात. परंतू, या एअरबॅग आतमध्ये मिलिसेकंदाच्या गतीने हवा जात असताना फुटत आहेत, यामुळे एअरबॅगचा स्फोट होऊन लोकांचा मृत्यू होत आहे. ही समस्या जुनीच आहे. परंतू, फ्रान्स सरकारने सिट्रोएनला यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. 

युरोपमधील सुमारे ४.४१ लाख C3 आणि DS3 कारवर परिणाम झाला आहे. इतकेच नाही तर गेल्या वर्षीपासून कंपनी लाखो कार रिकॉल करत आहे. एका फ्रेंच वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की कंपनी आता अधिकृतपणे प्रभावित वाहनांसाठी रिकॉल सुरू करणार आहे. 

टकाटा ठरतेय काळ...टकाटा एअरबॅग ही एकीकडे जीव वाचविणारी देखील आहे परंतू जीव घेणारी देखील आहे. टकाटा एअरबॅगमुळे आतापर्यंत फ्रान्समध्ये १३ जणांना जीव गमवावा लागला आहे. २०१४ पासून ही समस्या येत आहे. या समस्येतून एकही कार कंपनी सुटलेली नाही. या कंपन्यांना वेळोवेळी कार माघारी बोलावून सदोष एअरबॅग बदलून द्याव्या लागत आहेत. परंतू, सिट्रॉएनने रिकॉल न करता थेट वापरूच नका असे सांगितले आहे. म्हणजे या सदोष एअरबॅग वेगाने बदलता येतील. आतापर्यंत सिट्रोएन इंडियाने भारतात विकल्या जाणाऱ्या C3 वाहनांसाठी असा कोणताही स्टॉप ड्राइव्ह अलर्ट किंवा रिकॉल नोटीस जारी केलेला नाही.

टॅग्स :Citroen Indiaसिट्रॉनFranceफ्रान्स