शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Cheapest Bikes : १ लाख रुपयांपर्यंतच्या जबरदस्त बाईक्स; स्टायलिस्ट लूकसह मिळतो स्पोर्टी बाईकचा फील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 21:51 IST

पाहा कोणत्या आहेत या बाईक्स आणि कोणती मिळतायत फीचर्स.

भारतीय बाजारपेठेत कम्युटर बाइक्सची सर्वाधिक विक्री होते. या बाईक्सचे वैशिष्ट्य म्हणजे त्या किमतीत किफायतशीर आहे, तसेच मायलेजही उत्तम आहे. मात्र, वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्या बजेटच्या किमतीतही चांगल्या परफॉर्मन्सच्या बाइक्स देत आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येणार्‍या अशा 5 बाईक सांगत आहोत, ज्या स्टायलिस्ट लूकसह स्पोर्टी फिलही देतात.

1. Bajaj Pulsar 150या बाईकची सुरुवातीची किंमत 1 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 149.5 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 14bhp पॉवर आणि 13Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही बाईक neon, single disc आणि dual disc या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय यात हॅलोजन हेडलाइट युनिट, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बॅकलिट स्विच सारखे फीचर्स देण्यात आलेत.

2. Honda UnicornHonda Unicorn या बाईकची किंमत 1 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्सपैकी एक आहे. यात 162.7 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 13bhp पॉवर आणि 14Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तुमच्या सोयीसाठी, युनिकॉर्नमध्ये ट्यूबलेस टायर, अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिन स्टॉप स्विच, ABS सह फ्रंट डिस्क ब्रेक सारखे फीचर्स देण्यात आलेत.

3. Bajaj Pulsar NS125बजाज पल्सर NS 125 ची किंमत 99,347 (एक्स-शोरूम) इतकी निश्चित करण्यात आली आहे. बाईकमध्ये 124.45 cc इंजिन देण्यात आले आहे, हे इंजिन 12bhp पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. यात नायट्रोक्स मोनो-शॉकसह टेलिस्कोपिक फोर्क्स उपलब्ध आहेत. बजाज पल्सर NS125 ला सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो, जे अॅनालॉग टॅकोमीटर आणि स्पीड, ओडोमीटर, ट्रिप मीटर, क्लॉक यासारखी माहिती डिस्प्ले करते.

4. Honda SP 125या बाईकची किंमत 80,086 रुपये ते 84,087 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. यामध्ये एलईडी हेडलॅम्प आणि संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो. यामध्ये स्पीड, ओडोमीटर, ट्रिप मीटर, ईसीओ इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर, फ्युअल इकोनॉमी यासारखी माहिती डिस्प्ले होते. बाईकमध्ये 124 cc इंजिन देण्यात आले आहे, जे 11bhp आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. स्टँडर्ड रुपात या बाइकमध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात येतात, परंतु ग्राहक फ्रंट डिस्क ब्रेकचाही ऑप्शन आपल्याला मिळतो.

5. Hero Glamourया बाईकची सुरुवातीची किंमत 89,256 (एक्स-शोरूम) आहे. यात 124.7 cc इंजिन देण्यात आले आहे. ते 10.72bhp पॉवर आणि 10.6Nm चा टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात एलईडी हेडलाइट, ब्लूटूथ-अनेबल्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टम, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ फंक्शन आणि यूएसबी चार्जर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

टॅग्स :bikeबाईकbajaj automobileबजाज ऑटोमोबाइलHondaहोंडा