शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

केवळ कार चालवणे म्हणजे मायलेज मिळवणे नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 08:00 IST

लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी कारही नेहमी चांगल्या स्थितीत असणे जसे आवश्यक आहे तसेच या साऱ्या प्रवासामध्ये स्थिर व संतुलित वेग, योग्य गीयर ऑपरेशन आदी बाबींमुळे चांगले मायलेज मिळते तसेच सुरक्षित प्रवासही सिद्ध होतो

ठळक मुद्देकारच्या इंजिन क्षमतेनुसार कारचा वेग ताशी ४५ ते ६० कि. मी. या दरम्यान स्थिर असावाव टॉपचा वेग ताशी ६० कि.मी. ठेवला तर मायलेज खूप चांगले मिळू शकतेसरळ व सपाट रस्त्यावर कार चालवताना मायलेज स्थिर वेगाला खूप चांगले मिळते

कारचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे केला गेला तर कारची स्थिती ही चांगली राहाते,त्यामुळे कारचे आयुष्य, सुट्या भागांचे आयुष्य, चांगले मायलेज, चांगली सेवा त्या कारमुळे मिळू शकते. मात्र आपलीच कार आहे, कशीही दामटवू असा विचार केल्यास काही दिवसांमध्येच पांढरा हत्ती पोसल्याचा अनुभव नक्कीच येऊ शकतो. यासाठी कारचा नुसता शोभिवंत वस्तू म्हणूनही वापर न करता ती चालवणेही एक अतिशय महत्त्वाची कला समजून घेतली तर कार किफायतशीर म्हणून तुम्हाला अनुभवास येऊ शकेल. कोणतीही कंपनी झीरो मेन्टेनन्स म्हणून सांगत असली तरी ते चूक आहे हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

कारची केवळ बाह्य स्वच्छता कामाची नाही, तिचे अंतर्मनही ओळखा. कारच्या इंजिनाची ताकद, तिला लागणारे तेल, तिच्या टायरमधील हवा, तिच्या हेडलॅम्प व अन्य दिव्यांचे व्यवस्थापन, तिच्या ब्रेकचे व्यवस्थापन या बाबी पाहाण्यासाठी तुम्ही काही मेकॅनिक होण्याची वा तुमचे गॅरेज असायला हवे, याची आवश्यकता नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कार नेहमी सज्ज हवी. तिच्यात काही काही उणे दुणे असेल तर ते खटकल्यास ते लक्षात ठेवा व अगदीच आयत्यावेळी धावपळ करायला लागू नये याची दखल घेऊन आल्यावर त्या उण्यादुण्याला बाजूला करा. शक्यतो अधिक त्रासदायक असेल तर लांब पल्ल्याच्या प्रवासला जाऊ नका. दुखणे पहिले दुरुस्त करून घ्या. कार लांब नेण्याचे उद्दिष्ट स्पष्ट असायला हवे.

तुम्हाला कारचे ड्रायव्हिंग सुलभ व सुविधाजनक वाटायला हवे, कारच्या इंधनाची बचतही नीटपणे करायला हवी. तसेच ड्रायव्हिंग फटिग येणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी. उत्साही मानसिकतेत ड्रायव्हिंग केल्यास नेहमीच चांगले. लांब प्रवासाला नेण्यापूर्वी तिची पूर्ण तपासणी करा, त्यानंतर सुरुवातीला वायपर टॅंकमध्ये पाणी नीट आहे की नाही, ब्रेक, इंजिन तेल, कूलन्ट यांचा स्तर नीट आहे की नाही, ते तपासा. टायरची हवा तपासा. त्यानंतर वाहनाचे दिवे तपासा. ड्रायव्हिंगला बसण्यापूर्वी तुमचे आसन,आरसा या सर्व बाबी नीट जुळवून घेऊन मग प्रत्यक्ष ड्यायव्हिंग सुरू करा. प्रवासाला निघताना कारचे रनिंग किती झाले आहे, ते टिपून घ्या. कार चालवताना गीयर निहाय वेग ठेवा, अतिवेगापेक्षा स्थिर वेग महत्त्वाचा असतो. त्यासाठी तुमच्या कारचे इंजिनच तुम्हाला अनेकदा सांगत असते. त्यानुसार कारचा गीयर योग्य पद्धतीने टाकणे, त्यासाठी वेग योग्य ठेवणे, वळण, सरळ रस्ता, उतार, खडपडीत रस्ता या पद्धतीच्या पृष्ठभागावरून गाडी नेताना त्या त्या योग्य गीयर व वेगाने ती चालवा. साधारणपणे विनाकारण गीयर बदलू नका.

विविध कारच्या इंजिन क्षमतेनुसार कारचा वेग ताशी ४५ ते ६० कि. मी. या दरम्यान स्थिर ठेवू शकला व टॉपचा वेग ताशी ६० कि.मी. ठेवला तर मायलेज खूप चांगले मिळू शकते. त्यामुळे कार नियंत्रण करण्यासही सोपी असते. तसेच हा वेग कमी नाही, हे लक्षात घ्या. सरळ व सपाट रस्त्यावर कार चालवताना मायलेज स्थिर वेगाला खूप चांगले मिळते. अगदी चांगल्या ताकदीच्या कारलाही ताशी ८० कि. मी. चा वेग भरपूर व मायलेजदायी असू शकतो. मात्र एक्लरेशन देताना हळूवार व एकसंघ असले पाहिजे. स्थिर व संतुलीत वेग, त्यामुळे ड्रायव्हिंगला कंटाळा न येणे, चांगल्या वेगाबरोबरच नियंत्रण असणे या बाबी जमल्या म्हणजे कारच्या आयुष्यावरही चांगला परिणाम होत असतो, तसेच सुरक्षिततेने होणारे ड्रायव्हिंग केव्हाही चांगलेच नाही का?

टॅग्स :Automobileवाहनcarकार