शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

BYD Auto 3 EV उद्या होणार लाँच; या इलेक्ट्रिक गाड्यांना देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 17:17 IST

BYD Atto 3 EV launching in India on October 11: बिल्ड युअर ड्रीम उद्या भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार BYD ऑटो 3 (BYD Atto 3) लाँच करणार आहे.

नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. यातच चिनी कार निर्माता कंपनी बीव्हायडी (BYD) उद्या म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी नवीन कार सादर करत आहे. बिल्ड युअर ड्रीम उद्या भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार BYD ऑटो 3 (BYD Atto 3) लाँच करणार आहे. ही नवी कार देशातील इतर अनेक कारशी स्पर्धा करेल. या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.....

कशी असेल BYD Atto 3 ?या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये 49.92 kWh आणि 60.49 kWh चे दोन ब्लेड बॅटरी पॅक पर्याय मिळण्याची शक्यता आहे. यामुळे एका चार्जवर अनुक्रमे 345 किमी आणि 420 किमीपर्यंतचा पल्ला गाठता येतो. या कारची संभाव्य किंमत सुमारे 30 लाख रुपये असू शकते. तसेच याची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीत सुरु होऊ शकते. भारतात या कारची कोणाशी होणार स्पर्धा हे जाणून घेऊया...

Tata Nexon EVटाटाची Nexon EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. यात 40.5 kWh चा लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. जो एका चार्जवर 437 किमी पर्यंत धावू  शकतो. या कारची एक्स-शोरूम किंमत 17.50 लाख ते 20.04 लाख रुपये आहे.

MG ZS EVMG ZS EV एक्साईट आणि एक्सक्लुझिव्ह अशा दोन प्रकारांमध्ये येते. ज्यामध्ये 50.3kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या कारची इलेक्ट्रिक मोटर 174 bhp पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार एका चार्जवर 461 किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. याची किंमत 22.58 लाख ते 26.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Hyundai Kona ElectricHyundai ची Kona Electric देखील BYD Auto 3 ला टक्कर देऊ शकते. या कारमध्ये इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. ही EV एका चार्जवर 452 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. भारतात याची एक्स-शोरूम किंमत 23.84 लाख ते 24.02 लाख रुपये आहे.

महिंद्रा एक्सयूव्ही 400XUV400 इलेक्ट्रिक SUV पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. कारला PSM इलेक्ट्रिक मोटरसह 39.4 kWh बॅटरी पॅक मिळेल, जो IP 67 रेटिंगसह वॉटर आणि डस्ट-प्रूफ देखील आहे. ही कार 147hp पॉवर आणि 310 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. ही कार 456 किमीपर्यंतची रेंज देईल. ते ताशी 150 किमी वेगाने धावू शकते.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन