शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सेकंड हँड कार घेताय? कर्ज काढताना या गोष्टी नक्की तपासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 3:54 PM

आठ-दहा लाख रुपये गुंतवून नवीन कार घेण्याचे बजेट नसेल तर सेकंड हँड कारचा पर्याय असतो. भारतात या वापरलेल्या कारचे मार्केट नव्या कारपेक्षाही तेजीत आहे.

आठ-दहा लाख रुपये गुंतवून नवीन कार घेण्याचे बजेट नसेल तर सेकंड हँड कारचा पर्याय असतो. भारतात या वापरलेल्या कारचे मार्केट नव्या कारपेक्षाही तेजीत आहे. यासाठी स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय सारख्या बँका कर्जपुरवठा करतात. यासाठी ते सुलभ हप्त्यांची जाहिरातही करतात. जर तुम्ही अशी कार कर्जावर घेण्याचा विचार करत असाल तर तीचे रनिंग किती? अपघात झालेली कार आहे का? अशा प्रश्नांपेक्षा आणखी एक महत्वाचा प्रश्न असतो ते म्हणजे कर्ज घेताना घ्यावयाची काळजी. 

कर्ज घेताना बँका वेगवेगळ्या ऑफर्स ठेवतात. बँकांना व्यवसायच करायचा असल्याने त्या ग्राहकांच्या फाय़द्याचे कधीच पाहणार नाहीत. पण त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स ठेवतात. यामध्ये न भुलता त्यातलेत्यात आपल्या फायद्याचा पर्याय निवडायचा असतो. 

व्याज किती? वाहन कर्ज घेताना महत्वाचा मुद्दा म्हणजे व्याजाची टक्केवारी. हे व्याज 10.50 ते 18 टक्क्यांपर्यंत वार्षिक आकारले जाते. यासाठी गाडीला झालेली वर्षे पाहिली जातात. कार घेताना ग्राहक ऑनलाईनही कर्जाचे व्याज पडताळू शकतात. एसबीआय सेकंड हँड कार लोनसाठी 12.60 टक्क्यांपासून पुढे व्याज आकारते. तर एचडीएफसी 9.25 टक्क्यांपासून पुढे व्याज आकारते. या शिवाय कारची बाजारातील किंमतीच्या किती टक्के कर्ज मिळू शकेल याचाही विचार करावा. काही बँका 80 ते 85 टक्के रक्कमेचे कर्ज देतात. तर काही बँकां यापेक्षा जास्त रक्कमेचे कर्ज देतात. 

 

कर्ज मंजुरी वेळखाऊ प्रक्रियानवीन कारच्या कर्ज मंजुरीसाठी जास्त वेळ लागच नाही. मात्र, जुन्या कारवर कर्ज मंजुरीसाठी खूप वेळ लागतो. कारण कारची मूळ मालक आणि नवीन मालक यांच्यामध्ये करार करावा लागतो. यानंतर कार नवीन मालकाच्या नावावर व्हावी लागते. हे कागदपत्र, इन्शुरन्स आदी नव्या मालकाच्या नावावर झाल्यानंतर कर्ज मंजुर केले जाते. या प्रक्रियेसाठी कमीतकमी 4 ते 5 दिवस लागतात. तर नवीन कार घेण्यासाठी केवऴ 1 दिवस लागतो. 

कर्जाचा कालावधी अनेक बँका 5 वर्षांसाठी कर्ज देतात. जर कार खुपच जुनी असेल तर हा कालावधी कमी होतो. हा कालावधी कारच्या प्रकृतीवरही अवलंबून असतो. जर देखभाल खर्च जास्त येणार असेल तर बँका कमी कर्ज देतात. जर कारचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असले तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज फेटाळण्य़ाचे प्रमाण जास्त असते. मग खासगी बँका किंवा फायनान्सचा पर्याय उरतो. या कारची तपासणी करण्य़ासाठी बँका निरिक्षक पाठवितात. तो कारसाठी किती कर्ज द्यायचे याचा निर्णय घेतो. 

कागदपत्रे तपासावीतजुनी कार घेण्याआधी कागदपत्रे नीट तपासावीत. यासाठी आरटीओशीही संपर्क साधावा. गाडीचा क्रमांक आणि तिचा इंजिन क्रमांक हे तपासून घ्यावेत. यानंतरच ही कागदपत्रे बँकेकडे पाठवावीत. तसेच यापूर्वी कारचे मालक किती होते, यावरही कारचे लोन रक्कम अवलंबून असते. एकापेक्षा जास्त कारचे मालक झाले असतील तर कारची किंमत कमी होते.

 

कार विमाबँका 10 वर्षांपेक्षा जास्त वर्षे झालेल्या कारना कर्ज देत नाहीत. तसेच जर कागदपत्र विकणाऱ्याच्या नावावर नसतील तर बँका कर्ज देत नाहीत. यामुळे इन्शुरन्स नुतनीकरण करावा किंवा इन्शुरन्स ट्रान्सफर करून घ्यावा.

टॅग्स :carकारbankबँक