शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Royal Enfield ची सर्वात स्वस्त मोटारसायकल येतेय? तुमच्या बजेटमध्ये बसले एकदम फिट; धमाल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 11:03 IST

भारतात लॉन्च झाल्यानंतर या मोटारसायकलचा सामना होंडा CB350RS, जावा स्टँडर्ड 300, जावा फोर्टी टू आणि बेनेली इम्पेरिअलसोबत होईल.

नवी दिल्ली - रॉयल एनफील्डने भारतातील मोटारसायकल सेगमेंटवर मजबूत पकड मिळवली आहे. रॉयल एनफील्डचा सामना करण्यासाठी बजाज आणि ट्रायम्फ एकत्रितपणे लवकरच काही नव्या आणि दमदार मोटारसायकली बाजारत आणणार आहेत. हे पाहता, रॉयल एनफील्डदेखील 2022 मध्ये  बाजारावरील आपली पगड कायम ठेवण्याच्या दृष्टीने 4-5 नव्या बाईक्स बाजारात आणणार आहे. यांपैकी एक म्हणजे, हंटर 350. ही बाईक मीटिओर 350 च्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येत आहे. या मोटारसायकलचे टेस्ट मॉडेल नुकतेच दृष्टीस पडले आहे. जे प्रोडक्शनच्या अगदी जवळ असल्याचे दिसत आहे.

मीटिओर 350 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित -ही नवी मोटारसायकल मीटिओर 350 च्या प्लॅटफॉर्मवरच तयार करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी तिच्याच इंजिनाचा वापर करण्यात येणार आहे. रॉयल एनफील्ड हंटर 350 शक्यतो जे-प्लॅटफॉर्मवरच तयार केली जात आहे. या सोबत 349 सीसीचे इंजिन असेल. हे इंजिन 22 बीएचपी एवढी शक्ती आणि 27 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. 

या इंजिनसोबतच कंपनी 5-स्पीड गियरबॉक्सदेखील देऊ शकते. तसेच, परीक्षणादरम्यानच्या व्हिडिओमध्ये, ही मोटारसायकल फारच सहजपणे 0-100 किमी/प्रति तास एवढा वेग घेत असल्याचे दिसते. असे मानले जात आहे, की मीटिओर 350 च्या तुलनेत या नव्या मोटारसायकलचा भार अत्यंत कमी असेल, मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची आधिकृत माहिती मिळालेली नाही.

हंटर 350 ही या सेगमेंटमधील सर्वात जास्त परवडणारी मोटारसायकल? -आपण 2021 च्या रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि हिमालयन मॉडेल्समध्ये पाहिल्या प्रमाणेच, हंटर 350 देखील सेमी-डिजिटल कन्सोल आणि ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टीमसह येईल. हंटर 350 ही या सेगमेंटमधील सर्वात परवडणारी मोटारसायकल म्हणून समोर येऊ शकते. यामुळे बाईकसोबत अधिक चांगले दिसणारे एलईडी, डीआरएल आणि ब्लिंकर्स नसण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

भारतात लॉन्च झाल्यानंतर या मोटारसायकलचा सामना होंडा CB350RS, जावा स्टँडर्ड 300, जावा फोर्टी टू आणि बेनेली इम्पेरिअलसोबत होईल. भारतात या बाईकची सुरुवातीची एक्सशोरूम किंमत 1.70 लाख रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईकIndiaभारत