शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

BS6 : केवळ वाहनांच्या किंमतीच नाहीत, तर पेट्रोल, डिझेलही महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 8:22 AM

मागील काही वर्षांपूर्वीच बीएस ४ नियमावली लागू करण्यात आली होती. यामुळे आधीच वाहन कंपन्यांवर खर्चाचा बोजा वाढलेला होता. त्यातच दोन-तीन वर्षांत नवीन बीएस६ नियमावली लागू करण्यात येणार असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने येत्या 1 एप्रिलपासून बीएस ६ नियमावली लागू करण्याचे ठरविले आहे. यासाठी वाहन कंपन्यांनीही कंबर कसली आहे. येत्या 4 महिन्यांत सर्वच वाहन कंपन्यांना बीएस६ ची इंजिने, नविन नियमावलीनुसार सुरक्षा आदी वाहनांमध्ये द्यावे लागणार आहे. यामुळे वाहन निर्मितीचा खर्चही कमालीचा वाढणार आहे. काही कंपन्यांनी बीएस६ ची वाहने विकायलाही सुरूवात केली आहे. या वाहनांच्या किंमती वाढतानाच आता बीएस६ पेट्रोल, डिझेलच्या किंमतीही वाढणार आहेत. 

मागील काही वर्षांपूर्वीच बीएस ४ नियमावली लागू करण्यात आली होती. यामुळे आधीच वाहन कंपन्यांवर खर्चाचा बोजा वाढलेला होता. त्यातच दोन-तीन वर्षांत नवीन बीएस६ नियमावली लागू करण्यात येणार असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे मारुतीसारख्या बड्या कंपनीला डिझेलचे इंजिन विकसित करणे परवडणारे नसल्याने त्यांनी डिझेलच्या छोट्या कारच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्विफ्ट, इग्निस, बलेनो, अर्टिगा सारख्या कारना डिझेल इंजिन दिल्यास त्यांची किंमत तब्बल 2.5 लाखांनी वाढणार  आहे. असे झाल्यास ग्राहक पेट्रोललाच पसंती देतील, यामुळे कंपनीने या कारना डिझेल इंजिन न देण्याचा निर्णय घेतला आहे. 

याचबरोबर फोक्सवॅगन या कंपनीनेही 1 जानेवारीपासून डिझेल इंजिनच्या कारचे उत्पादन बंद करण्याचे ठरविले आहे. यामुळे आता अन्य कंपन्याही डिझेल इंजिन बनविण्याबाबत विचार करण्याची शक्यता आहे. त्यातच वाहनचालकांना त्रस्त करणारी आणखी एक बातमी येत आहे. बीएस ६ इंधन बनविण्यासाठी कंपन्यांना जादाचा खर्च येणार आहे. याचा भार ग्राहकांवरच टाकण्याचा विचार कंपन्यांचा असून तशी परवानगीही कंपन्यांनी केंद्र सरकारकडे मागितली आहे. खासगी आणि सरकारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर प्रिमियम वसुलण्याची मागणी केली आहे. 

जर केंद्र सरकारने या कंपन्यांचा प्रस्ताव स्वीकारला तर पुढील पाच वर्षांसाठी डिझेलवर 0.80 रुपये आणि पेट्रोलवर 1.50 रुपये प्रति लीटर शुल्क वसुलले जाणार आहे. असे झाल्यास इंधनाच्या किंमतीतही वाढ होणार आहे. बीएस ६ इंधन बनविण्य़ासाठी संशोधनावर कंपन्यांनी मोठी रक्कम गुंतविली आहे. तसेच इलेक्ट्रीक वाहनांमुळे ऑईल बाजारावर दबाव येण्याची चिन्हे आहेत. यामुळे ही रक्कम रिकव्हर करणे कंपन्यांना कठीण दिसत आहे. यामुळे काही रक्कम वसूल झाल्यास कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असल्याने प्रिमिअम आकारण्याची मागणी करण्यात आली आहे.  

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलcarकारMaruti Suzukiमारुती सुझुकीVolkswagonफोक्सवॅगन