Maruti Suzukiची एमपीव्ही अर्टीगा BS6 कार बाजारपेठेत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 10:11 AM2019-08-01T10:11:04+5:302019-08-01T10:30:24+5:30

Maruti Suzuki कंपनीने एमपीव्ही अर्टीगा BS6 कार अपडेटसह पुन्हा लॉन्च केली आहे.

BS6 Compliant Maruti Suzuki Ertiga Launched | Maruti Suzukiची एमपीव्ही अर्टीगा BS6 कार बाजारपेठेत दाखल

Maruti Suzukiची एमपीव्ही अर्टीगा BS6 कार बाजारपेठेत दाखल

googlenewsNext

मुंबई: Maruti Suzuki कंपनीने एमपीव्ही अर्टीगा BS6 कार अपडेटसह पुन्हा लॉन्च केली आहे.  त्याचबरोबर नवीन अर्टिगाच्या किंमत देखील सुमारे 10,000 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. 

Maruti Suzuki BS6 अर्टिगाच्या बेस मॉडेल LXi ट्रिमची एक्स शोरूम किंमत 7.55 लाख आहे. तर टॉप ZXi ट्रिमची किंमत 10.05 लाख असणार आहे. यापूर्वीची किंमत (पेट्रोल इंजिन) 7.44 लाख ते 9.95 लाख रुपयांच्या दरम्यान होती. 
तसेच Maruti Suzukiची ही सहावी कार असेल की ती  BS6 इंजिनसह अपडेट केली आहे. मारुती कंपनीने याआधी बीएस 6 इंजिनसह वॅगनआर, स्विफ्ट, अल्टो, डिजायर आणि बलेनो सारख्या कार लॉन्च केल्या आहेत.  

याव्यतिरिक्त मारुती कंपनाने फॅक्ट्री- फिटेड सीएनजी किट असणारी आर्टिगा देखील लॅान्च केली आहे. या कारची किंमत 8.87 लाख असणार आहे. अर्टिगाच्या VXi  व्हेरियंटमध्ये सीएनजीचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, सीएनजी किट अर्टिगाला 26 किलोमीटर प्रति किलोग्रामचा माइलेज देईल. तसेच अर्टिगा K15B मध्ये 1.5 लीटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले गेले आहे, जे 105 bhp पॅावर आणि 138 एनएम टॉर्क देते. हे इंजिन  पाच स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आणि  ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मध्ये देखील उपलब्ध आहे.
 

Web Title: BS6 Compliant Maruti Suzuki Ertiga Launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.