जीपचा बोल्ड लुक! मेरिडियनच्या दोन लिमिटेड एडिशन लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 17:18 IST2023-04-12T17:18:11+5:302023-04-12T17:18:21+5:30
ही एसयुव्ही केवळ १०.८ सेकंदांत ० ते १०० किमी प्रती तासाचा वेग पकडते. ही एसयुव्ही १९८ किमी प्रति तासाच्या टॉप स्पीडने धावू शकते.

जीपचा बोल्ड लुक! मेरिडियनच्या दोन लिमिटेड एडिशन लाँच
जीप कंपनीने मेरिडिअनच्या ग्राहकांच्या मागणीवरून सध्याच्या मॉडेलमध्ये काही बदल करून आणखी एक बोल्ड लुक दिला आहे. जीपने दोन लिमिटेड एडिशन लाँच केल्या आहेत. जीप मेरिडियन एक्स आणि जीप मेरिडियन अपलँड अशी या दोन एडिशनची नावे आहेत.
या एसयुव्ही सिल्व्हर मून आणि गॅलॅक्सी ब्ल्यू अशा दोन रंगांत आणण्यात आल्या आहेत. या एसयुव्हींची किंमत ३२.९५ लाखांपासून सुरु होते. बुकिंग वेबसाईटवर सुरु केले आहे. एप्रिलल्या दुसऱ्या पंधरवड्यापासून डिलिव्हरी सुरु केली जाणार आहे.
ही एसयुव्ही केवळ १०.८ सेकंदांत ० ते १०० किमी प्रती तासाचा वेग पकडते. ही एसयुव्ही १९८ किमी प्रति तासाच्या टॉप स्पीडने धावू शकते. जीपच्या वाहनांच्या ताफ्यात रँगलर, कंपास, मेरिडियन आणि ग्रँड चेरोकी अशा एसयुव्ही आहेत. जीप भारतासाठी खूप खास आहे. अमेरिकेच्या बाहेर जीप साठी भारत हा पहिला देश आहे जो स्थानिक पातळीवर 4 मॉडेल्स बनवितो.
ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी ‘जीप वेव एक्सक्लूझिव्ह’ नावाने नवा ओनरशिप प्रोग्रॅम लाँच केला आहे. या प्रोग्रॅमनुसार तीन वर्षांची वॉरंटी, ९० मिनिटांत सर्व्हिस पॅकेज सुरु करणे आणि जीप कोर्टसी एज, जीप जीनियस व जीप एडवेंचर कंसर्ज सारखे प्रोग्रॅम आहेत.