शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

'या' कंपनीकडून 8 कार लाँच करण्याची प्लॅनिंग; जाणून घ्या काय असेल खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 18:38 IST

BMW: येत्या आठ आठवड्यात आठ उत्पादने देशात सादर करण्याची कंपनीची योजना आहे.

नवी दिल्ली : लक्झरी कार कंपनी बीएमडब्ल्यू इंडियाची (BMW) 2023 मध्ये देखील विक्रीत चांगली कामगिरी असण्याची शक्यता आहे. तसेच, कंपनी इलेक्ट्रिक सेडान I7 सह अनेक उत्पादने विकण्याची शक्यता शोधत आहे. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह म्हणाले की, विक्रीच्या दृष्टीने हे वर्ष कंपनीसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. येत्या आठ आठवड्यात आठ उत्पादने देशात सादर करण्याची कंपनीची योजना आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना विक्रम पावाह म्हणाले, "आम्हाला खात्री आहे की विक्रीची गती निश्चितपणे चालू राहील. आम्ही पुढील वर्षीही उत्तम उत्पादने आणणार आहोत. मी खूप सकारात्मक आहे कारण आम्ही आठ प्रमुख ऑफरसह सुरुवात करत आहोत, त्यापैकी तीन खूप मोठी उत्पादने आहेत. 2023 मध्येही आम्ही खूप मजबूत वाढ पाहणार आहोत." दरम्यान, कंपनी कार विभागातील बीएमडब्ल्यू आणि मिनी ब्रँड अंतर्गत उत्पादने आणि बीएमडब्ल्यू मोटरराड अंतर्गत बाईक विकते.

बीएमडब्ल्यूने अलीकडेच आपली फ्लॅगशिप एसयूव्ही बीएमडब्ल्यू एक्सएम भारतात लाँच केली आहे. 1978 मध्ये लाँच झालेल्या M1 नंतर एसयूव्ही हे M ब्रँड अंतर्गत दुसरे स्टँडअलोन उत्पादन आहे. भारतात कारची किंमत 2.60 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.  एक्सएम ही M सिरिजमधील पहिली एसयूव्ही असणार आहे, जी प्लग-इन हायब्रिड टेक्नॉलॉजीसह येईल.

सर्वाधिक पॉवरफूल आहे इंजिन इंजिनबद्दल बोलायचे झाले तर बीएमडब्ल्यू एक्सएममध्ये 4.4-लीटर पेट्रोल इंजिन आहे. एसयूव्हीचे पॉवर आउटपुट सर्वाधिक 644 Bhp पॉवर आणि 800 Nm पीक टॉर्क आहे. कंपनीने भारतात लाँच केलेली हे सर्वात पॉवरफूल एसयूव्ही असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे आणि ते प्लग-इन हायब्रिड सिस्टम देखील आहे. बॅटरी पॅकची क्षमता 25.7 kWh आहे. विशेष म्हणजे हे इलेक्ट्रिक मोडमध्ये 88 किमी धावू शकते.

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूAutomobileवाहन