शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:34 IST

Bharat Taxi Launch: १ जानेवारी २०२६ पासून दिल्लीत सरकारी पाठबळ असलेली 'भारत टॅक्सी' कॅब सर्व्हिस सुरू झाली आहे. ओला-उबरच्या मनमानीला लगाम लावणारी ही सेवा नेमकी काय आहे? जाणून घ्या भाडे आणि वैशिष्ट्ये.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी दिल्लीच्या रस्त्यांवर एक मोठी क्रांती होत आहे. ओला आणि उबरसारख्या खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी केंद्र सरकारचे पाठबळ असलेली 'भारत टॅक्सी' ही कॅब सेवा अधिकृतपणे लाँच करण्यात आली आहे. वाढलेले भाडे, सर्ज प्रायसिंग आणि राइड कॅन्सलेशनमुळे त्रस्त असलेल्या दिल्लीकरांसाठी हे नवीन वर्षाचे मोठे 'सरप्राईज' ठरले आहे.

ही सेवा केवळ एक अ‍ॅप नसून, ती सहकारी तत्त्वावर चालवली जाणारी जगातील सर्वात मोठी ड्रायव्हर-ओन्ड यंत्रणा म्हणून समोर येत आहे. 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड'द्वारे चालवल्या जाणाऱ्या या मॉडेलमध्ये ड्रायव्हरच मालक आहेत.

प्रवाशांना मिळणारे फायदे:

नो सर्ज प्रायसिंग : पाऊस असो, गर्दीची वेळ असो किंवा सण, भारत टॅक्सीमध्ये भाडे वाढणार नाही.

पारदर्शक भाडे दर: ४ किमी पर्यंत किमान ३० रुपये, त्यानंतर पुढील अंतरासाठी निश्चित दर असतील.

सुरक्षितता: ही सेवा थेट दिल्ली पोलिसांशी जोडलेली असून रियल-टाइम ट्रॅकिंग आणि एम-पिन सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये यात आहेत.

बहुपर्यायी सेवा: एकाच अ‍ॅपवर ऑटो, बाईक टॅक्सी आणि कार (AC, Premium, XL) उपलब्ध असतील.

ओला-उबरमध्ये ड्रायव्हर्सना २० ते ३० टक्के कमिशन द्यावे लागते, मात्र भारत टॅक्सीमध्ये सुरुवातीला 'झिरो कमिशन' मॉडेल असेल. ड्रायव्हर्सना त्यांच्या कमाईचा ८० ते १०० टक्के हिस्सा थेट मिळेल. यामुळे दिल्लीत लाँचपूर्वीच तब्बल ५६,००० ड्रायव्हर्सनी या प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे. भारत टॅक्सीचे अ‍ॅप Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध आहे. प्रवाशांसाठी 'Bharat Taxi' आणि ड्रायव्हर्ससाठी 'Bharat Taxi Driver' असे दोन स्वतंत्र अ‍ॅप्स आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Bharat Taxi Launches: Affordable Fares and No Surge Pricing in Delhi

Web Summary : Bharat Taxi, a government-backed cab service, launched in Delhi on January 1, 2026, challenging private monopolies. Offering no surge pricing, transparent fares, and enhanced safety features like real-time tracking, it aims to benefit passengers and drivers with a zero-commission model initially. Over 56,000 drivers have already registered.
टॅग्स :OlaओलाUberउबर