इटलीची अग्रगण्य दुचाकी वाहन निर्माता कंपनी Benelli आपल्या जबरदस्त बाइक्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु 2005 मध्ये Benelli या कंपनीचं चिनी कंपनी Qianjiang समूहाने अधिग्रहण केलं होतं. आता या कंपनीनं नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Benelli Dong आशियाई बाजारपेठेत लाँच केली आहे.अलीकडेच Benelli या कंपनीनं भारतीय बाजारपेठेत आपला प्रवेश केला आहे आणि सध्या कंपनीच्या वाहन पोर्टफोलिओमध्ये फक्त बाईक्स उपलब्ध आहेत. दरम्यान, ही स्कूटर सादर केल्यानं या ठिकाणी बाजारातही ही स्कूटर उपलब्ध होईल असं म्हटलं जात आहे. कंपनीनं या स्कूटरला एक युनिक डिझाईन दिलं आहे. यामध्ये LED हेडलँप आणि टेललाईट्ससह सर्क्युलर LCD डिस्प्ले दिला आहे. कंपनीनं स्कूटरची साईज कॉम्पॅक्ट आणि वजनही कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या स्कूटरमध्ये 1.2kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर इंजिन आणि 1.56kWh क्षमतेचं रिमुव्हेबल बॅटरी पॅक देण्यात आलं आहे. या स्कूटरचा सर्वाधिक वेग हा ४५ किलोमीटर प्रति तास आहे. एकदा चार्ज केल्यास ही स्कूटर ६० किलोमीटर जाऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच यामध्ये एक कंपनीनं स्पीकर्सही दिले आहेत. त्याच्या सहाय्यानं सामान्य इंजिन असलेल्या गाड्यांच्या आवाजाबद्दल माहितीही घेतली जाते.काय असेल किंमत?सध्या कंपनीनं ही बाईक इंडोनेशियामध्ये लाँच केली आहे. त्या ठिकाणी या बाईकची किंमत इंडोनेशियाच्या करन्सीमध्ये 36,900,000 इतकी आहे. भारतीय रूपयानुसार या बाईकची किंमत 1.9 लाख रूपये इतकी आहे. भारतीय बाजारपेठेत ही स्कूट लाँच करायची असल्यास किंमतीवर कंपनीला लक्ष द्यावे लागेल. भारतीय बाजारपेठेतील किंमतीनुसार ही किंमत अधिक आहे.
Benelli नं सादर केली नवी Electric Scooter 'Dong'; उत्तम ड्रायव्हिंग रेजसह आहेत जबरदस्त फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 15:59 IST
कंपनीनं या Electric Scooter मध्ये दिलेत जबरदस्त फीचर्स
Benelli नं सादर केली नवी Electric Scooter 'Dong'; उत्तम ड्रायव्हिंग रेजसह आहेत जबरदस्त फीचर्स
ठळक मुद्देएकदा चार्ज केल्यास ६० किलोमीटरपर्यंत प्रवास करता येणार.स्कूटरचा सर्वाधिक वेग ४५ किलोमीटर प्रति तास असेल.