शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

Bajaj ची नवी Pulsar 125 लॉन्च, डिझाइन पाहून प्रेमात पडाल! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 20:03 IST

ही बाईक ब्लू आणि रेड अशा दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

बजाज ऑटोसाठी पल्सर ही एक सर्वाधिक यशस्वी ठरलेली बाइक आहे. कंपनीकडे 125 सीसी ते 250 सीसी पर्यंतच्या अनेक पर्यायांमध्ये पल्सर उपलब्ध आहे. आता कंपनीने पल्सरमध्ये आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. बजाज ऑटोने Pulsar 125 ची नवीन कार्बन फायबर एडिशन लॉन्च केली आहे. या बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तिचा लुक. तर जाणून घेऊयात या बाईकच्या किंमतीपासून ते फिचर्सपर्यंत सर्वकाही.

नवे कार्बन फायबर एडिशन दोन व्हर्जन- सिंगल-सीट आणि स्प्लिट मध्ये आणण्यात आले आहे. ही बाईक ब्लू आणि रेड अशा दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. बजाज पल्सर 125 कार्बन फायबर सिंगल-सीट एडिशनच किंमत 89,254 रुपये एवढी आहे. तर स्प्लिट-सीट एडिशनची किंमत 91,642 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे.

असा आहे  बाईकचा लुक - कंपनीने दोन्ही कलर ऑप्शनसह ब्लॅक कलरच्या बेस पेंटचा वापर केला आहे. हेडलाइट काऊल, फ्यूल टँक, इंजिन काऊल, रिअर पॅनल आणि अलॉय व्हील स्ट्राइप्सवर ग्राफिक्स देण्यात आले आहे. कंपनीने फ्रंट फेंडर, टँक आणि रिअर काउलवर कार्बन फायबर ग्राफिक्स जोडले आहे. यात आकर्षक 3D लोगो, नियॉन हेडलाइट्स आणि काळ्या रंगाचे अलॉय व्हीलचा समावेश आहे.

इंजिन आणि पॉवर -नवी बजाज पल्सर 125 सिंगल पॉड हेडलॅम्प यूनिटसह ट्विन डे-टाइम रनिंग लाइट्स, मस्क्युलर फ्यूल टँक आणि साइड-स्लंग एग्झॉस्टसह येते. या दुचाकीला 124.4cc, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,500rpm वर 11.64bhp पॉवर आणि 6,500rpm वर 10.80Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्सला जोडण्यात आले आहे. बाइकच्या फ्रंटला 240mm डिस्क आणि रिअरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. पल्सर 125 चा ग्राउंड क्लिअरन्स 165mm आणि कर्ब वेट 142kg आहे. 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकtwo wheelerटू व्हीलरAutomobileवाहन