शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बजाजनं लॉन्च केली खूपच स्वस्त बाईक, फीचर-मायलेज सर्वच मस्त! जाणून घ्या किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 12:08 IST

जर आपण एखादी स्वस्त बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर आता बाजारात आणखी एक नवी बाईक उपलब्ध झाली आहे.

जर आपण एखादी स्वस्त बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर आता बाजारात आणखी एक नवी बाईक उपलब्ध झाली आहे. बजाज ऑटोने अपडेटेड Platina 110 ABS भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. 2023 बजाज प्लॅटिना 110 ABS ची सुरुवातीची किंमत 72,224 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे 110cc सेगमेंटमधील ABS सह असलेली ही पहिली आणि एकमेव मोटरसायकल आहे. कंपनीने ही बाइक 4 कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च केली आहे.

इंजिन आणि गिअरबॉक्स -या नव्या बजाज प्लॅटिना 110 एबीएसमध्ये 115.45cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड, फ्यूअल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7,000 RPM वर 8.4 bhp पॉवर जनरेट करते. तर 5,000 RPM पर 9.81 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. यात LED DRL सह हॅलोजन हेडलॅम्प युनिट, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेन्ट क्लस्टर, 17 इंचाचे व्हील आणि 11 लीटर क्षमतेचा फ्यूअल टँक देण्यात आला आहे.

बजाज प्लॅटिना 110 एबीएसचे फीचर्स -या बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि समोर डुअल स्प्रिंग-लोडेड शॉक एब्जॉर्बर देण्यात आले आहे. ब्रेकिंगसाठी पुढील बाजूस सिंगल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS)सह डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात येते. बाईकमध्ये एक डिजिटल इंस्ट्रूमेन्ट क्लस्टरही आहे. जे खूपसारी माहिती दर्शवते. आपल्याला यात, गिअर पोझिशन, गिअर गायडन्सशिवाय, ABS अलर्ट देखील मिळेल.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकtwo wheelerटू व्हीलर