नवी दिल्ली : Bajaj Auto ने त्यांची बहुप्रतिक्षित क्रुझर बाईक Avenger Street 160 चे ABS मॉडेल भारतात लाँच केले आहे. या बाईकची किंमत दिल्लीमध्ये एक्स शोरुम 82,253 असणार आहे. या बाईकद्वारे बजाजने अॅव्हेंजर 180 ला बदलले आहे. या बाईकची किंमत 6 हजार रुपये जास्त होती.
नव्या सुरक्षा नियमावलीमध्ये दुचाकी, चारचाकींना एबीएस किंवा सीबीएस देणे बंधनकारक केले आहे. यामुळे भारतातील सर्वच बाईक यापुढे एबीएसमध्ये मिळणार आहेत. केवळ होंडाकडेच सीबीएस प्रणाली आहे. बजाज कंपनीने नव्या अॅव्हेंजर स्ट्रीटमध्ये सिंगल चॅनेल एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) दिली आहे.
अॅव्हेंजर स्ट्रीट 160 क्रूझर बाइकमध्ये 160.4 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 14.7 बीएचपी ची ताकद आणि 13.5 एनएमचा टॉर्क प्रदान करते. ही ताकद अॅव्हेंजरच्या 180 शी मिळतीजुळती आहे. इंजिनला 5-स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. पुढे टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ट्विन शॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. ब्रेकसाठी पुढील बाजुला 220 mm सिंगल डिस्क आणि मागे ड्रम ब्रेक आहेत. पुढच्या चाकाला एबीएस देण्यात आले आहे.