जबरदस्त मायलेज; लवकरच येणार Bajaj ची CNG बाईक! पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 09:16 PM2023-10-20T21:16:37+5:302023-10-20T21:16:50+5:30

Bajaj CNG Bike: बजाज ऑटो भारतीय बाजारात पहिली सीएनजी बाईक आणण्याच्या विचारात आहे.

Bajaj CNG Bike: Bajaj's CNG bike coming soon! See details... | जबरदस्त मायलेज; लवकरच येणार Bajaj ची CNG बाईक! पाहा डिटेल्स...

जबरदस्त मायलेज; लवकरच येणार Bajaj ची CNG बाईक! पाहा डिटेल्स...

Bajaj Bike: भारतातील लोकप्रिय टू-व्हिलर ब्रँड Bajaj ऑटो भारतीय बाजारात CNG बाईकचा आणण्याचा विचार करत आहे. पेट्रोलचा खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषणावर आळा घालणे, हा यामागचा उद्देश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजाज सीएनजी-कम-पेट्रोल बाईकवर काम करत आहे. ब्रुझर E101, असे या बाईकला कोडनेम दिले आहे. 

कधी लॉन्च होणार?
रिपोर्टनुसार, सर्व काही योजनेनुसार झाले, तर 6 महिने ते 1 वर्षात ही बाईक बाजारात येऊ शकते. काही प्रोटोटाइप युनिट्स आधीच बनवल्या गेल्या आहेत. ही 110 सीसीची बाइक असू शकते. सुरुवातीला कंपनीच्या औरंगाबाद येथील फॅक्टरीत याचे उत्पादन करण्याचे नियोजन आहे, नंतर पंतनगर फॅक्टरीत उत्पादन केले जाईल.

CNG बाईकचे नाव काय असेल?
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या सीएनजी बाईकसाठी प्लॅटिना गाडीचा विचार केला जात आहे. मात्र, बजाज ऑटोचे ईडी राकेश शर्मा यांनी याबाबतची माहिती देण्यास नकार दिला. परंतु, ते म्हणाले, "आम्हाला आमच्या पोर्टफोलिओमध्ये 'स्वच्छ इंधन' चा वाटा निश्चितपणे वाढवायचा आहे, ज्यात ईव्ही, इथेनॉल, एलपीजी आणि सीएनजीचा समाविष्ट आहे." अलीकडेच बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सीएनजी बाईकबाबत वक्तव्य केले होते.

Web Title: Bajaj CNG Bike: Bajaj's CNG bike coming soon! See details...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.