Ola, Ather ला नाश्त्यामध्ये खाऊन टाकेल बजाज; राहुल बजाज यांच्या वक्तव्यावर भाविशनी आरसा दाखविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 16:44 IST2021-10-29T16:43:44+5:302021-10-29T16:44:13+5:30
Rajiv Bajaj got Answer by Bhavish Aggarwal: देशात आता ईलेक्ट्रीक स्कूटरचा जमाना सुरु झाला आहे. यामुळे आता कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. आता ही लढाई मालकांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

Ola, Ather ला नाश्त्यामध्ये खाऊन टाकेल बजाज; राहुल बजाज यांच्या वक्तव्यावर भाविशनी आरसा दाखविला
देशात आता ईलेक्ट्रीक स्कूटरचा जमाना सुरु झाला आहे. यामुळे आता कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. भारतीय रस्त्यावर आधीपासून असलेल्या पेट्रोलवरील दुचाकी कंपन्यांना नव्या कंपन्यांकडून चांगलीच स्पर्धा करावी लागणार आहे. ईलेक्ट्रीक स्कूटरकडे उशिरा वळल्यामुळे असेल किंवा दुर्लक्ष केल्याचा फटका आता बजाज, होंडा, हिरो सारख्या मोठ्या कंपन्यांना बसणार आहे.
आता ही लढाई मालकांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. बजाज ऑटोचे प्रमुख राजीव बजाज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याला Ola Electric चे भाविश अग्रवाल आणि Ather चे तरुण मेहता यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ''मी BET (Bajaj, Royal 'Enfield' आणि TVS) वरून पैज लावण्यास तयार आहे. आम्ही चॅम्पियन आहोत आणि एक चांगले रेकॉर्डही आहे. आणि चॅम्पियन्स नाश्त्यामध्ये OATS (Ola, Ather, Tork Motors आणि SmartE) खातात.'', असे राजीव बजाज यांनी म्हटले होते.
बजाजने Bajaj Pulsar च्या विसाव्या वर्षानिमित्त Bajaj Pulsar 250 ची दोन मॉडेल लाँच केली आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते. यावर भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी राजीव बजाज यांना आरसाच दाखविला आहे. त्यांनी थेट हल्ला न करता एका ट्विटर युजरचे ट्विट रिट्विट केले आहे.
एका युजरने बजाज यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली आहे. ओलाने एकही स्कूटर विकलेली नसताना पहिल्याच सेलमध्ये 90000 हून अधिक स्कूटर विकल्या आहेत. Ather ने एकट्या जुलैमध्ये 1800 स्कूटर विकल्या आहेत आणि तुमच्या बजाज ऑटोने जानेवारी 2020 ते जुलै 2021 पर्यंत फक्त 3300 Bajaj Chetak विकल्या आहेत. हे ट्विट अग्रवाल यांनी रिट्विट करत राजीव बजाज यांना जोरदार चपराक लगावली आहे. तर तरुण मेहता यांनी राजीव बजाज यांनी आज माझा दिवस चांगला घालविला असा टोला लगावला आहे.