शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
2
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
3
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
4
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
5
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
6
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
7
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
8
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
9
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
10
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
11
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
12
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
13
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
14
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
15
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
16
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
17
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
18
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
19
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'

Bajaj Chetak Electric स्कूटरचं बंपर बुकिंग; केवळ ४८ तासांत बंद करावी लागली प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 16:16 IST

Electric Scooter : केवळ २ हजारांत कंपनीनं सुरू केली होती बुकिंग

ठळक मुद्देकेवळ २ हजारांत कंपनीनं सुरू केली होती बुकिंगही स्कूटर स्पोर्ट्स आणि ईको या दोन मोडमध्ये येते.

देशातील आघाडीची दुचाकी वाहन निर्माता Bajaj Auto नं गेल्या वर्षी बाजारात आपली एकमेव इलेक्ट्रीक स्कूटर चेतक सादर केली होती. सुरुवातीला या स्कूटरला बरीच लोकप्रियता मिळाली पण नंतर कंपनीने त्याचं बुकिंग थांबवलं होतं. पण पुन्हा एकदा कंपनीने या स्कूटरचं बुकिंग सुरू केलं होतं. परंतु दोनच दिवसांत झालेल्या बंपर बुकिंग झाल्यामुळे कंपनीनं केवळ 48 तासांत या स्कूटरचं बुकिंग पुन्हा बंद केलं. कंपनीनं केवळ २ हजार रूपये देऊन या स्कूटरचं बुकिंग सुरू केलं होतं. सध्या ही स्कूटर पुणे आणि बंगळुरू या दोनच शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. लवकरच या स्कूटरची विक्री देशातील अन्य 24 शहरांमध्येही सुरू केली जाईल, अशी कंपनीची योजना आहे. बाजारात ही स्कूटर प्रामुख्याने TVS iQube आणि Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करते.

कशी आहे Bajaj Chetak बजाजच्या चेतक स्कूटरने साधारण 20 वर्षांपूर्वी भारतीयांच्या मनात गारुड केले होते. एका बाजुला असलेले इंजिन, खाली करून पेट्रोल त्या इंजिनात उतरले की कीक स्टार्ट मारायाची स्टाईल आणि तिच्यावरून नेण्यात येणारे साहित्य आदीसाठी ही चेतक प्रसिद्ध होती. बजाजने हीच थीम पुन्हा नव्या रुपात आणली आहे. कंपनीनं या स्कूटरमध्ये 3kWh क्षमतेच्या  IP67 रेटेड लिथियम आयन बॅटरी पॅकचा वापर केला आहे. याणध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रीक मोटर 4kW ची पॉवर आमि 16Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर स्पोर्ट्स आणि ईको या दोन मोडमध्ये येते.

ड्रायव्हिंग रेंजस्कूटर इको मोडमध्ये 95 किमी पर्यंत जास्तीत जास्त ड्रायव्हिंग रेंज देते, तर स्पोर्ट मोडमध्ये 85 किमी पर्यंत चालविली जाऊ शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. दरम्यान ही रेंज ड्रायव्हिंग करण्याची पद्धत आणि रोड्सच्या कंडिशनवर अवलंबून आहे. या स्कूटरची पूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी जवळपास 5 तासांचा वेळ लागतो आणि क्विक चार्जिंग सिस्टममध्ये 1 तासात स्कूटर 25 टक्के चार्ज होते.  

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलscooterस्कूटर, मोपेडelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनonlineऑनलाइन