Maruti Swift ला सेफ्टीच्या बाबतीत झिरो रेटिंग; Tata नं अशी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 05:26 PM2021-08-30T17:26:07+5:302021-08-30T17:27:06+5:30

नुकतेच मारुती स्विफ्टला लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये शून्य रेटिंग मिळाले. या क्रॅश टेस्टमध्ये मारुती स्विफ्टचे जे व्हेरिएंट सामील झाले होते,  त्यात दोन एअरबॅग देण्यात आल्या होत्या.

Automobile sector TATA motors trolls maruti swift scores zero stars in latin ncap crash test in twitter | Maruti Swift ला सेफ्टीच्या बाबतीत झिरो रेटिंग; Tata नं अशी उडवली खिल्ली

Maruti Swift ला सेफ्टीच्या बाबतीत झिरो रेटिंग; Tata नं अशी उडवली खिल्ली

Next

टाटा मोटर्स आपला प्रतिस्पर्धक मारुती सुझुकीला सोशल मीडियावर ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाही. टाटा मोटर्सच्या गमतीशीर पोस्ट सातत्याने इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यावेळी टाटा मोटर्सने मारुती स्विफ्टला लॅटिन एन्केप क्रॅश टेस्टमध्ये शून्य रेटिंग मिळाल्याने ट्रोल केले आहे. (Automobile sector TATA motors trolls maruti swift scores zero stars in latin ncap crash test in twitter)

यासंदर्भात कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो पोस्ट करण्यात आला होता.  यात "Don't gamble with safety" अर्थात सुरक्षिततेसोबत जुगार खेळू नका, असे लिहिण्यात आलेले होते. यात कंपनीने स्विफ्ट नावाचे इंग्रजी शब्द (SIWTF) असे लिहिले होते. मात्र, काही वेलानंतर ही पोस्ट हटविण्यात आली. मात्र, ही पोस्ट थोड्याच वेळात जबरदस्त व्हायरल झाली होती.

नुकतेच मारुती स्विफ्टला लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये शून्य रेटिंग मिळाले. या क्रॅश टेस्टमध्ये मारुती स्विफ्टचे जे व्हेरिएंट सामील झाले होते,  त्यात दोन एअरबॅग देण्यात आल्या होत्या. एवढेच नाही, तर लॅटिन एन्केप क्रॅश टेस्टमध्ये डीझायरलाही शून्य रेटिंग मिळाले आहे. या क्रॅश चाचणी दरम्यान, स्विफ्टला प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी 15.53% (6.21 गुण), मुलांच्या सुरक्षेसाठी 0% आणि (0 पॉइंट), पादचारी रस्त्यावर पादचारी सुरक्षेसाठी 6.98% (3 पॉइंट) मिळाले आहेत.

लॅटिन एनसीएपीने म्हटले आहे की, खराब साइड इफेक्ट प्रोटेक्शन, कमी व्हिप्लॅश स्कोर, स्टँडर्ड साइड प्रोटेक्शन एअरबॅग्सची कमतरता, ईएससी नसणे, रियर सेंटर सीटमध्ये तीन-पॉइंट यूनिटएवजी लॅप बेल्टचा वापर, या गोष्टींमुळे कारला झिरो (0) स्टार रेटिंग मिळाले आहे. एवढेच नाही तर, सुझुकी या कारमध्ये चाइल्ड रिस्ट्रंट सिस्टिम (सीआरएस)ची शिफारस करत नाही.

Web Title: Automobile sector TATA motors trolls maruti swift scores zero stars in latin ncap crash test in twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.